दारव्हा रोडच्या देहविक्री नेटवर्कची अनेकांना भुरळ

By Admin | Updated: February 13, 2016 02:11 IST2016-02-13T02:11:54+5:302016-02-13T02:11:54+5:30

शहरातील देहविक्रीच्या नेटवर्कमध्ये दारव्हा मार्गाची वेगळीच ओळख आहे. येथील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ््यावर या नेटवर्कचे सर्व्हर आहे.

Darwha Road's Devi Vikri Network has attracted many people | दारव्हा रोडच्या देहविक्री नेटवर्कची अनेकांना भुरळ

दारव्हा रोडच्या देहविक्री नेटवर्कची अनेकांना भुरळ

ग्रामीण रसद : शिस्तीच्या खात्यातीलच म्होरक्या
यवतमाळ : शहरातील देहविक्रीच्या नेटवर्कमध्ये दारव्हा मार्गाची वेगळीच ओळख आहे. येथील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ््यावर या नेटवर्कचे सर्व्हर आहे. येथूनच ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना वाममार्गाला लावण्यात येते. बऱ्याचदा शासकीय नोकरीचे अमीष दाखविले जात आहे. मात्र आतापर्यंत अधिकृतपणे कुणीच तक्रार केली नसल्याने सर्वकाही बिनबोभाट सुरू आहे.
देहविक्रीच्या व्यवसायाला शिस्तीच्या खात्यातूनच पाठबळ मिळत आहे. अपार्टमेंटमधील फ्लॅट एका कर्मचाऱ्याच्या मालकीचा असल्याचे सर्वश्रृत आहे. या ठिकाणी हा व्यवसाय जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मुलींचे नेटवर्क सांभाळण्याचा धंदा सेवेतीलच तीन महिला बजावत आहेत. त्यांच्या कामाची व गिऱ्हाईक शोधण्याची वेगळीच पद्धत आहे. यंत्रणेतील माहिती असल्यामुळे अद्यापपर्यंत येथे एकदाही कारवाई झालेली नाही. हे नेटवर्क हॅक करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा झाला. मात्र आर्थिक देवाण-घेवाणीचा अ‍ॅन्टीव्हायरस प्रभावीपणे वापरला जातो. महिन्याकाठी २० हजार रुपये रक्कम मोजण्यात येते. सीटी ते ग्रामीण आणि रोडवरच्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकारातून हे नेटवर्क उभारण्यात आले आहे. याची व्याप्तीही फार मोठी आहे.
सोशल मीडियाव्दारे बैठक फिक्स झाल्यानंतर फ्लॅटवर प्रवेश मिळतो. आंबटशौकीनांमध्ये याची सध्या चांगलीच क्रेझ आहे. याशिवाय नामांकित व्यक्तींच्या वास्तव्य असलेल्या परिसरातील अड्ड्यानेही चांगलाच जोर पकडला आहे. प्रत्येकजण कानोकानी याची माहिती पुरविण्याचे काम करत आहे. नवीन काही म्हणून येथे येणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या जाळ््यात ओढल्या जात आहे. दुर्दैवाने दाट वस्ती व वर्दळ असलेल्या भागांमध्येही वैयक्तिक स्वरुपाचे व्यवसाय आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागच्या भागातील अपार्टमेंटही आता चर्चेत आले आहे. एकंदरच ठराविक वस्त्यांपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आता शहराच्या विविध भागात फोफावला आहे. यावर नियंत्रणासाठी अजूनपर्यंत कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. तसा प्रयत्नही करण्यात आला नाही.

Web Title: Darwha Road's Devi Vikri Network has attracted many people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.