बंधाऱ्यामुळे शेतीला धोका
By Admin | Updated: July 2, 2014 23:28 IST2014-07-02T23:28:41+5:302014-07-02T23:28:41+5:30
नाल्याचे पाणी अडून शेती पिकाला वापरता यावे, शिवाय जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने ठाणेगाव येथे बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या

बंधाऱ्यामुळे शेतीला धोका
पारवा : नाल्याचे पाणी अडून शेती पिकाला वापरता यावे, शिवाय जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यादृष्टीने ठाणेगाव येथे बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या जंगलातील हा बंधारा निकृष्ट कामामुळे किती दिवस टिकेल याविषयी प्रश्नचिन्ह आहे.
कृषी विभागाने निर्माण केलेला या बंधाऱ्यासाठी गिट्टी, रेती आदी साहित्य अतिशय हलक्या दर्जाचे वापरले आहे. सिमेंटचे प्रमाणही कमी सदर बंधारा निर्माण करताना नाल्यातील मौल्यवान सागवान वृक्षाच्या अस्तित्वाविषयीसुद्धा विचार केला गेला नाही. या कामांची चौकशी करून कारवाईची मागणी आहे.
या नाल्यामध्ये सागवानाची मोठमोठी वृक्ष आहेत. बंधाऱ्यात पाणी अडल्यानंतर ती कोसळून पडणार आहे. या प्रकारात शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होईल. या बाबीचा विचार बंधारा बांधताना केला गेला नाही. बंधाऱ्याची उंचीही केवळ तीन ते साडेतीन फूट असल्याने नेमका पाण्याचा किती साठा होईल, हा प्रश्नही याठिकाणी निर्माण झाला आहे. गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या या कामाच्या बांधकामावर पाण्याचा अत्यल्प वापर करण्यात आला.
बंधाऱ्याची निर्मिती करताना संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी कधीही लक्ष दिलेले नाही. काम झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदाराने या विभागाला सूचना दिली. संपूर्ण बांधकाम होईपर्यंत अधिकारी याठिकाणी दाखल झाले नाही. त्यामुळे कंत्राटदाराचे चांगलेच फावत गेले. या कामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)