नृत्य कलावंत सिंगापुरात चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 21:38 IST2019-05-27T21:38:25+5:302019-05-27T21:38:42+5:30
सिंगापूर येथे झालेल्या नृत्य संगीत रसप्रभा भागवथर फेस्टीवलमध्ये यवतमाळच्या नृत्य कलावंतांची प्रस्तुती विलोभनीय ठरली. या फेस्टीवलमध्ये भारतासोबतच ईस्ट एशियाच्या बऱ्याच कलाकारांची कला प्रस्तुत झाली.

नृत्य कलावंत सिंगापुरात चमकले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सिंगापूर येथे झालेल्या नृत्य संगीत रसप्रभा भागवथर फेस्टीवलमध्ये यवतमाळच्या नृत्य कलावंतांची प्रस्तुती विलोभनीय ठरली. या फेस्टीवलमध्ये भारतासोबतच ईस्ट एशियाच्या बऱ्याच कलाकारांची कला प्रस्तुत झाली.
यवतमाळ येथील कलावंतांना पद्मभूषण सरोजा वैद्यनाथन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कथ्थक सोलोमध्ये पलक जन्नावार हिला सूर्यप्रभा वैभव पुरस्कार देण्यात आला. ईश्वरी चांदोरे, मुस्कान गाढवे यांना सूर्यप्रभा विशेष पुरस्कार प्राप्त झाला. अक्षरा कोठारी ही सूर्यप्रभा विशेष पुरस्काराची, तर प्रीती लाखकर हिला सूर्यप्रभा उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शीतल बोंद्रे हिला कथ्थक फ्यूजन सूर्यप्रभा विभूती, तर दीशा कोठारी सूर्यप्रभा विभूती पुरस्काराची मानकरी ठरली. या विद्यार्थिनींना शिल्पा थेटे, निशिकांत थेटे, शीतल बोंद्रे, प्रीती लाखकर आदींचे मार्गदर्शन लाभले.