स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:14 IST2017-11-25T00:14:06+5:302017-11-25T00:14:59+5:30
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील एसडीओ कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील एसडीओ कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन एसडीओंना देण्यात आले.
जिल्ह्यात तब्बल सवा दोन लाख हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने उद्धस्त केली. शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या आहे. परंतु संबंधित अधिकारी शेताची पाहणी करायला येत नाही आणि अहवाल वरिष्ठांकडे पाठवित नाही. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठविण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे एक दिवसीय धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून त्यात नुकसान भरपाईची मागणी केली. निवेदनावर विश्वास लांडगे, केशव खंदारे, धनंजय कांबळे, राजू डहाके, भीमराव इंगळे, प्रमोद दीक्षित, प्रेमराव सरगर, सरदार खान, शरद मस्के, मनोहर कोल्हेकर, दिलीपसिंग बास्टे, किशोर ठाकरे, संजय आडे यांच्या स्वाक्षºया आहे.