शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये संचारबंदीचा व्यावसायिकांसह सामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:40 IST

शहर व तालुक्यात कोरोना वाढत आहे. परिणामी कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहर व श्रीरामपूर, काकडदाती, धनकेश्र्वर, ...

शहर व तालुक्यात कोरोना वाढत आहे. परिणामी कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहर व श्रीरामपूर, काकडदाती, धनकेश्र्वर, शेंबाळपिंपरी, बेलोरा, जांब बाजार, वरूड, गायमुखनगर या आठ ग्रामपंचायत क्षेत्रात ३ ते ८ मार्चच्या मध्यरात्रीदरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या कालावधीत सर्वप्रकारची जीवनाश्यक दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. केवळ बँकेचे कर्मचारी त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करू शकतील, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने एटीएम, फोन-पे, गुगल-पे व ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू न शकणार्‍यांना मात्र बँका बंदचा त्रास होत आहे. वैद्यकीय शिक्षणासाठीच्या शेवटच्या फेरीत हवे असलेले महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश पक्का करण्यासाठी आवश्यक असलेला डीडी काढून ७ मार्चपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खात्यात रक्कम असली, तरी बँकांचे आर्थिक व्यवहार बंद असल्याने डीडी कसा काढावा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डीडी विहित मुदतीत महाविद्यालयात जमा न केल्यास दोन वर्षे रात्रंदिवस मेहनत करून डाॅक्टर होण्याचे पाहिलेले स्वप्न भंग होते की काय, असाही प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडला आहे. अनेक व्यावसायिकांनी खरेदी केलेल्या मालापोटी आधीच होलसेलरला चेक दिले असून, घरी रक्कम असूनसुद्धा खात्यात टाकता येत नसल्याने दिलेले चेक बाऊन्स होऊन आर्थिक भुर्दंड बसण्याची भीती त्यांना सतावत आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या व वेळेवर आजारी पडलेल्या रुग्णांजवळ नगदी पैसे नसल्याने खासगी रुग्णालयातील उपचार व औषधोपचार कसे करावे, असा प्रश्न भेडसावत आहे. यापूर्वीच्या कडक लाॅकडाऊनमध्ये बँकांचे व्यवहार तीन वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. परंतु यावेळी संपूर्ण व्यवहारच बंद ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे बँकेचे व्यवहार जीवनावश्यक बाब समजून सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.

बॉक्स

श्रीरामपूर येथील एका विद्यार्थिनीचा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, अकोला येथे बीएमएससाठी नंबर लागला आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी ७ मार्चपर्यंत डीडी जमा करण्याचे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले आहे. तिचे पालक श्रीरामपूर येथील बँकेत डीडी काढण्यासाठी गेले. त्यांना ७ मार्चपर्यंत सर्व व्यवहार बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खात्यात पैसे असूनसुद्धा डीडी काढण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे पालक अनिल देशमुख यांनी सांगितले.