क्रूझर चोरटे अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:44 IST2017-11-17T00:44:42+5:302017-11-17T00:44:55+5:30
वसंतनगर परिसरातून एक महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या क्रूझरचा पोलिसांनी शोध घेतला असून आदिलाबाद येथून पाच चोरट्यांना जेरबंद केले.

क्रूझर चोरटे अखेर जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : वसंतनगर परिसरातून एक महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या क्रूझरचा पोलिसांनी शोध घेतला असून आदिलाबाद येथून पाच चोरट्यांना जेरबंद केले.
सैयद असलम सैयद सलिम (२४) रा.काळी दौ., सलाम शाह समशेर शाह (२२) रा.दुधे ले-आऊट पुसद, शोएब खान अख्तर खान (२१) व शोएब खान फरीद खान (२१) दोघेही रा.वसंतनगर आणि आवेश अहेमद सलीम अहेमद (२२) रा.पार्वतीनगर पुसद अशी आरोपींची नावे आहे. महिनाभरापूर्वी वसंतनगरमधून अमोद्दीन फकरोद्दीन रा.काळी दौ. यांच्या मालकीची क्रूझर (क्र.एम.एच.२९/ए.डी.५५६९) चोरीस गेली होती. तिची किमत साडेसात लाख रुपये होती. अमोद्दीन फकरूद्दीन येथील वसंतनगरमधील सासूरवाडीत आले होते. त्यांनी रात्री आपले वाहन सासºयांच्या घरासमोर उभे ठेवले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही क्रूझर चोरून नेली.
या प्रकरणी ७ आॅक्टोबरला वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, ठाणेदार प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पोलीस उपनिरीक्षक राजू खांडवे, पोलीस कर्मचारी गोपाल वास्टर, मुन्ना आडे, राहुल माहुरे, नागेश वास्टर, मोहसीन खान आदींनी या गुन्ह्याचा छडा लावला.
मुख्य आरोपी सैयद असलम सैयद सलीम (२४) याच्या मोबाईल लोकेशनवरून वसंतनगर पोलिसांनी त्याला किनवट जि.नांदेड येथून ताब्यात घेतले. नंतर त्याने दिलेल्या कबुलीवरून चार आरोपींना तेलंगणातील आदिलाबाद येथून अटक केली. हे चौघेही आदिलाबाद येथे वाहन विकण्यासाठी गेले होते.