शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉस वोटिंगचा धोका

By admin | Updated: January 21, 2016 02:15 IST

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याचा धोका वाढला आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याचा धोका वाढला आहे. हा पक्रार टाळण्यासाठी पॅनलचे प्रमुख आणि उमेदवारांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहे. अगदी चार दिवसांवर येवून ठेपलेल्या या निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. राजुदास जाधव अध्यक्ष असलेल्या या संस्थेचे सात हजार ७०० मतदार आहेत. १५ वर्षांपूर्वी ३३ कोटी रुपये उलाढाल असलेली ही संस्था आज ६०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर पोहोचली आहे. मागील काही वर्षात संस्थेने विविध क्षेत्रात साधलेली प्रगती लक्षणीय आहे. अशा या संस्थेचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी प्रामुख्याने यावेळच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दोन पॅनलचे ३४ आणि इतर नऊ, असे ४३ उमेदवार रिंगणात आहे. राजुदास जाधव यांच्या नेतृत्त्वातील सहकार पॅनल आणि मधुकर काठोळे यांच्या पुढाकारातील महासमन्वय पॅनल यांच्यात थेट सामना होत आहे. मात्र गेली काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे क्रॉस वोटिंगची संख्या वाढण्याची शक्यता बळावली आहे. सहकारात साधारणत: एकाच पॅनलच्या बाजूने मतदान होते. आतापर्यंतचा या संस्थेच्या निवडणुकीतीलही हाच अनुभव आहे. यावेळी मात्र वेगळे चित्र समोर येत आहे. मतदानासाठी वैयक्तिक उमेदवाराला पसंती देण्याची शक्यता वाढली आहे. या संस्थेचा मतदार शिक्षक आणि कर्मचारी हा बुध्दीजीवी वर्ग असल्याने ते योग्य उमेदवारांचीच निवड करतील, यात शंका नाही. याशिवाय जो उमेदवार विजयाच्या जवळपास पोहोचू शकतो, त्यालाच पसंती दिली जावू शकते. मतदानाचा कालावधी जसजसा जवळ येत आहे, तसतशी रंगत वाढत आहे. आमची उमेदवारी आणि पॅनल कसे सक्षम आहे, याविषयीचे दावे केले जात आहे. आपल्याकडे एवढ्या संघटना आहे, त्यांची मतदारसंख्या एवढी आहे, असे सांगून विजयाचे गणित मांडले जात आहे. यासोबतच क्रॉस वोटिंग होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यानच्या काळातच काही लोकं पॅनल बाजूला ठेवत स्वत:साठी मते मागत असल्याच्या बाबीही चर्चिल्या जात आहेत. त्यामुळेही क्रॉस वोटिंग वाढण्याची शक्यता आहे. मात्र कॅडर बेस मतदारांमधून असा प्रकार होणार नाही, असेही ठामपणे सांगितले जात आहे. (वार्ताहर)