शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:02 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्देजलयुक्तच्या कामावर प्रश्नचिन्ह : उन्हाळ्यापूर्वीच भूजल पातळी अर्धा मीटर घटली

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या अभियानात तांत्रिक अडचणी तर राहिल्या नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये ओतूनही प्रशासनात कुठेतरी पाणी मुरल्याची शंका व्यक्त केली जात आहे.यवतमाळ जिल्हा सतत दुष्काळी स्थितीचा सामना करत आहे. यावर्षीही जिल्ह्यात अपुरा पाऊस पडला. यामुळे भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली गेली आहे. उन्हाळ्याचे तीन महिने पुढे आहेत. अशात भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली आली आहे. पुढील काळात ही भूजलपातळी आणखी खाली जाण्याचा धोका आहे.जिल्ह्यात यावर्षी ७०० एमएम इतका पाऊस झाला. पडलेला पाऊस डोंगरमाथ्यावरून सरळ खाली वाहून गेला. पडलेले पाणी काही प्रमाणात साठविल्या गेले. मात्र ते पाणी जमिनीत मुरले नाही. यामुळे संपूर्ण जिल्हा आज दुष्काळाच्या सावटात आहे.जलयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यातील अनेक भागात पार पडले. ज्या भागात हे कामकाज घेण्यात आले. त्या ठिकाणी याचा फारसा प्रभाव दिसत नाही. यामुळे जलयुक्त शिवार योजनेत खोदण्यात आलेले शेततळे तंत्रशुद्ध पद्धतीने झाले नव्हते काय, नदीपात्र आणि नाल्यांच्या रूंदीकरणासोबत डोंगरमाथ्यावरचे कामकाजही मोठे आहे. असे असतानाही भूजल पातळीत वाढ झाली नाही. उलट दरवर्षीच त्यामध्ये घट नोंदविली जात आहे. यामुळे कोट्यवधी रूपयांच्या खर्चानंतरही भूजल पातळीत सुधारणा न झाल्याने दुष्काळी उपाययोजना राबवाव्या लागणार आहे.हरियाली, वॉटरशेड प्रकल्पाचे काय झाले?जलयुक्त शिवार अभियानापूर्वी हरियाली योजना राबविली गेली. वॉटर शेड प्रकल्पाअंतर्गत डोंगराच्या पायथ्याशी आडवे चर खोदण्यात आले. डोंगरावर पाणी मुरविण्याचे काम वर्षानुवर्षे राबविले जात आहे. यानंतरही भूजलस्त्रोत चिंताजनक आहे. यामुळे सिंचन समृद्धीला बे्रक लागला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई