राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा होरपळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:12 PM2019-08-01T13:12:45+5:302019-08-01T13:13:07+5:30

निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.

Crops burnt in 14,000 hectares in the state | राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा होरपळल्या

राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा होरपळल्या

Next
ठळक मुद्दे१० हजार हेक्टर शेतजमिनीवरील खडक उघडे

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने व दुष्काळामुळे राज्यातील १४ हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट झाल्याचा धक्कादायक अहवाल शासनाने सादर केला. यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले.
सततच्या दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहे. मात्र ऋतुचक्र बदलाने फळबाग लागवडच अडचणीत सापडली आहे. गतवर्षी पडलेला अपुरा पाऊस आणि तापलेल्या अतिउन्हामुळे फळबागा होरपळल्या आहेत. यामध्ये संत्रा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी फळबागेच्या नुकसानीचे सर्व्हेक्षणच झाले नाही. यामुळे नुकसानीचा खरा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार पावसाअभावी नागपूर आणि अमरावती विभागासोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १४ हजार हेक्टवरील फळबागा नष्ट झाल्या आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला. हे नुकसान भरून न निघणारे आहे. शेतकरी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करीत असताना निसर्गाचा हा प्रघात झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच खचले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात नुकसानग्रस्त फळबागांचे सर्व्हेक्षणच झाले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. मात्र कृषी विभागाने हा आरोप फेटाळला आहे. तथापि नेमक्या कुठल्या बागांचे सर्व्हेक्षण झाले आणि कुठल्या बागा सुटल्या, हे कोडेच आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाल्यानंतरच ही बाब स्पष्ट होणार आहे. यामुळे वाळलेल्या फळबागांचे सर्व्हेक्षण न झालेले शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहे.
फळबाग लागवडीचा कल कायम राहावा म्हणून कृषी मंत्रालयाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वालाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली. त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळबागांना भाऊसाहेब फुंडकर योजनेतून हेक्टरी ६० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये फळबाग लागवड करणे आणि ठिबक सिंचनासह इतर बाबींचा समावेश आहे.

शेतकऱ्यांचा थेट मंत्र्यांना फोन
जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील विलास परसराम पाटील यांची संत्राबाग करपली. त्यांच्या बागेची नोंद कृषी सहाय्यकानी केली नाही. यामुळे त्यांना हेक्टरी केवळ सहा हजार ४०० रूपयांची मदत मिळाली. फळबागेच्या मदतीला ते मुकले. जिल्ह्यात असे अनेक शेतकरी आहे. त्यामुळे पाटील यांनी थेट कृषीमंत्र्यांकडे तक्रार केली.

सर्वाधिक नुकसान चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये
गतवर्षी आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेल्या. राज्यभरात १० हजार हेक्टरवरील पीक खरडून गेले. यात सर्वाधिक नुकसान चंद्रपूरमध्ये झाले. या जिल्ह्यात तब्बल चार हजार ४१० हेक्टर शेतजमीन खरडून गेली. यवतमाळमध्ये तीन हजार ९९८ हेक्टरचे नुकसान झाले. या ठिकाणी खडक उघडा पडला. ही शेत जमीन दुरूस्त होणे अवघड आहे. तेथे पीक येणार नाही. ही शेती आता बंजर होणार आहे.

Web Title: Crops burnt in 14,000 hectares in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती