शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अतिपावसाने जिल्ह्यातील पीक परिस्थिती नाजूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 5:00 AM

क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याचा धोका आहे. काही भागात पाणी साचल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. यानंतर जोरदार पाऊस कोसळला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि आता पाऊस धो-धो स्वरूपात बरसत आहे. काही भागात हा पाऊस क्षमतेपेक्षा जास्त झाला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शेतात तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

ठळक मुद्देअनेक तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस : कापूस, सोयाबीन पिवळे पडण्याचा धोका, दहा हजार हेक्टरमध्ये नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जून महिन्यात पावसाने मासिक सरासरीच्या ११० टक्के पावसाची नोंद केली तर जुलैमध्ये कोसळणाऱ्या पावसाने  १२५ टक्के मासिक सरासरी गाठली आहे. हा पाऊस पिकांना धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुढील काही दिवस नुकसानीचे पंचनामे सुरू राहणार आहे. यानंतर अंतिम अहवाल समोर येणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याचा धोका आहे. काही भागात पाणी साचल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. यानंतर जोरदार पाऊस कोसळला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि आता पाऊस धो-धो स्वरूपात बरसत आहे. काही भागात हा पाऊस क्षमतेपेक्षा जास्त झाला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये दलदल निर्माण झाली आहे. यामुळे शेतात तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. किडींचे आक्रमणही झाले आहे. पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन आणि तूर ही पिके पिवळी पडत आहेत. अतिपावसाने ही पिके करपण्याचाही धोका आहे. वाढ खुंटल्याने पिकाच्या उत्पन्नावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे.जुलै महिन्याची सरासरी १९० मिमीची आहे. प्रत्यक्षात २३८ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस मासिक सरासरीच्या १२५ टक्के बरसला आहे. आणखी सात दिवसांचा कालावधी बाकी आहे. प्रत्येक पिकाला पाण्याची आवश्यकता असते; मात्र निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाला तर तो पिकांना घातक असतो. सध्या याच परिस्थितीतून शेतकरी जात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे जुलै महिन्यातील पावसात आणखी भर पडणार आहे. सततच्या पावसाने शेतशिवारातील कामे खोळंबली आहे. किडीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. शेतशिवारात तणही वाढले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांची दारव्हा, दिग्रस, पुसदमध्ये पाहणी - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. अतिवृष्टीमुळे दारव्हा, दिग्रस, पुसद तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या तीनही तालुक्यांना शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेटी देऊन बाधित भागाची पाहणी केली. तसेच तालुकास्तरीय समितीची सभा घेतली. नैसर्गिक आपत्ती आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचे दोन दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.  

सहस्त्रकुंड, बेंबळा आणि निळोणा प्रतिबंधित क्षेत्र  - संततधार पावसामुळे उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प आणि यवतमाळनजीक निळोणा धरण ओव्हर फ्लो होण्याच्या अवस्थेत आहे. पावसाळ्यात धरण आणि धबधबा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशा गर्दी दरवर्षी जीवघेण्या अपघाताच्या घडतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकल्पांसह सहस्त्रकुंड धबधबा १ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले.

दोन प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू   - जिल्ह्यात पूस प्रकल्पात ९६.७५ टक्के जलसाठा झाला आहे. अरुणावती ६२.७६, बेंबळा ६६.८९, गोकी ३९, वाघाडी ७२.२०, सायखेडा ८६.२८, अधरपूस ७०.५५, बोरगाव ४६.१४, अडाण ६३.०३, तर नवरगाव धरणात ४४.३१ टक्के जलसाठा झाला आहे. तर बेंबळाचे दोन गेट १० सेमीने उघडून २० क्यूसेक तसेच अडाणचे पाच गेट ५ सेमीने उघडून २४.७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस