शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : पावसाअभावी पिके करपली, निकृष्ट बियाण्यांचाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात तुरळक वगळता दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील पिके कोमेजण्याची, करपण्याची शक्यता बळावली. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.तालुक्यात यावर्षी ६६ हजार १३५ हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली. २० जूनच्या आत सर्वांची पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पूरक पाऊस पडला नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची काही पिके तग धरुन आहे. मात्र हजारो हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू पिके अडचणीत आली आहे. यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत खरीप हंगामाकरिता वेळेवर शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खतांची व्यवस्था केली. यावर्षी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाल्याच्या बातम्या आल्या. जून उजाडल्यानंतर काही प्रमाणात पाऊस पडला. वातावरण निर्मिती झाल्याने मृग नक्षत्राला प्रारंभ होताच पेरणीला सुरुवात करण्यात आली.तालुक्यात ३१ हजार २५० हेक्टरवर कपाशी, २५ हजार ३०० हेक्टरवर सोयाबीन, आठ हजार ५०० हेक्टरवर तूर लागवडीचा अंदाज आहे. या प्रमुख पिकासह एकूण ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड करण्यात आली. परंतु आठवडा उलटून गेला तरी पूरक पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांनी जमिनीतच दम तोडला. उगवलेल्या कोंबांना पाणी मिळाले, त्यांनी तग धरला. मात्र पाण्याअभावी इतर पिके करपत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.यावर्षी कोरोनामुळे आधीच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रथम शेतमाल विक्रीची समस्या निर्माण झाली. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर अनेकांचा नंबर लागला नाही. चुकारे उशीरा मिळाले. तसेच कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण आली. या सर्व संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी तजवीज करुन पेरणी केली. आता आसमानी संकट उभे राहिले. जून महिना संपत आला तरी एकही सार्वत्रिक व दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अंकुरलेले बियाणेही करपत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले आहे.मदतीची अपेक्षापावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवली. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास कोरडवाहू क्षेत्रातील सर्वच पेरण्या उलटण्याची भीती आहे. त्यामुळे असमानी, सुलतानी संकटांचे वार झेलणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेती