महागावात कोळपे पाटील पतसंस्था संचालकांवर गुन्हा
By Admin | Updated: December 25, 2014 23:39 IST2014-12-25T23:39:16+5:302014-12-25T23:39:16+5:30
पुणे येथील कोळपे पाटील मल्टी स्टेट को.आॅप. क्रेडीट सोसायटीची महागाव शाखा कोणतीही पूर्व सूचना न देता बंद करण्यात आली. यामुळे ग्राहकांनी दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेच्या संचालकावर

महागावात कोळपे पाटील पतसंस्था संचालकांवर गुन्हा
महागाव : पुणे येथील कोळपे पाटील मल्टी स्टेट को.आॅप. क्रेडीट सोसायटीची महागाव शाखा कोणतीही पूर्व सूचना न देता बंद करण्यात आली. यामुळे ग्राहकांनी दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेच्या संचालकावर महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महागाव येथे कोळपे पाटील पतसंस्थेची शाखा २७ डिसेंबर २०१३ रोजी सुरू झाली होती. त्यासाठी त्यांनी चार एजंटांची नियुक्ती केली होती. दररोज ग्राहकांकडून वसुली करून बँकेत ठेवले जात होते. येथील गजानन पाटे यांनी ५० हजार रुपये मुदतठेव भरले होते. सुभाष गणपत वारकड यांनी ५० हजार रुपये तर सुनिता गजानन पाटे यांनीही ५० हजार रुपये या बँकेत ठेव ठेवली होती. तसेच प्रत्येक एजंटाचे २५ हजार रुपये मुदतीठेवीमध्ये होते. सुरज गावंडे यांनी व्यापाऱ्यांकडून एक लाख ५१ हजार ३०० रुपये गोळा करून बँकेत जमा केले होते. तर ज्ञानेश्वर पतंगे याने दोन लाख ४३ हजार १५० रुपये, परमेश्वर बेले याने ५५ हजार ६५० रुपये, दत्तराव कोल्हेकर याने दोन लाख १९ हजार रुपये असे मिळून आठ लाख ९४ हजार ६६० रुपये शाखेमध्ये एजंटांनी भरला होता. तसेच अनंत नागरगोजे यांनी १६०० रुपये जमा ठेव केली होती. परंतु कुठलीही सूचना न देता महागाव शाखा बंद केली. शाखेचा फलकही काढून नेला. ग्राहकांना हा प्रकार माहीत होताच त्यांनी शाखा कार्यालयापुढे धाव घेतली. परंतु तेथे काहीही आढळले नाही. त्यावरून महागाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. अनंता नागरगोजे, गजानन पाटे, सुभाष वारकड, ज्ञानेश्वर पतंगे, परमेश्वर बेले, सुरज गावंडे, दत्तराव कोल्हेकर, सुनीता पाटे यांनी तक्रार दिली.
त्यावरून पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीधर उद्धवराव कोळपे, संचालक सरस्वती श्रीधर कोळपे, संजय कांतीलाल लोधा, महादेव अभिमान अंधारे, राजेश विजयकुमार जैन, संजय श्रीधर अपनगुरे, रघुराज बालप्रसाद मोहिते, शाम नागोराव शिंदे, लक्ष्मण उद्धवराव कोळपे, मकरंद चंद्रप्रकाश देशमुख, दीपक गोविंद दुधभाते, मल्लारी धोंडीबा सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश दिगंबर पाटील, एस.आर. तावडे यांच्याविरुद्ध भादंवि ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्या आला आहे. कोळपे पाटील पतसंस्थेने ग्राहकांची व एजंटाची फसवणूक केल्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महागाव ठाणेदार करीत आहे.