शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अल्पवयीनांच्या जीवावर गुन्हेगारी टोळ्या सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 10:03 PM

गुन्हेगारी टोळ्यांचे शहर म्हणून यवतमाळची कुप्रसिद्धी आहे. वरदहस्तातून यवतमाळातील डॉनचा खून झाला. या खुनापाठोपाठ अनेक महत्वाकांक्षा असलेले भाई सक्रिय झाले आहेत. अल्पवयीन मुलांना नादी लावून त्यांच्या जीवावर आपली दहशत निर्माण करण्याचा गेम सुरू आहे.

ठळक मुद्देअवैध सावकारीतून मिळतोय बुस्ट : पैसा फेकून यंत्रणेचा वापर, भविष्यात मोठ्या संघर्षाची नांदी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुन्हेगारी टोळ्यांचे शहर म्हणून यवतमाळची कुप्रसिद्धी आहे. वरदहस्तातून यवतमाळातील डॉनचा खून झाला. या खुनापाठोपाठ अनेक महत्वाकांक्षा असलेले भाई सक्रिय झाले आहेत. अल्पवयीन मुलांना नादी लावून त्यांच्या जीवावर आपली दहशत निर्माण करण्याचा गेम सुरू आहे. अवैध सावकारी, दारू तस्करी आणि राजकीय पाठबळ हे या टोळ्यांना पूरक परिस्थिती निर्माण करणारे ठरत आहे.पैसा असला की कितीही मोठी यंत्रणा विकत घेता येते याचा अनुभव गुन्हेगारी वर्तुळाला आला आहे. आता तर गुन्हेगारच पोलिसांच्या पोस्टींगचा सौदा करतात. त्यामुळे प्रत्येक खेळीत टोळीच्या म्होरक्यांकडून यंत्रणेचा वापर होतो. दिवटेचा खून झाल्यानंतर यवतमाळ शहरावर एकछत्री अंमल आणता येईल, अशी सुप्त इच्छा अनेकांची होती. मात्र आता आर्थिक देवाणघेवाण व व्यावसायिक स्पर्धेतून दिवटे हत्याकांडासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एकत्र आलेल्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे. परस्परांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याने प्रत्येकाने स्वतंत्र टोळीचे संघटन केले आहे. यात १६ ते २२ वयोगटातील मुलांचा भरणा अधिक आहे.अल्पवयीन मुले भावनिकअल्पवयीन मुले भावनिक असल्याने परिणामाची चिंता करीत नाही. हाच फॅक्टर हेरुन गुन्हेगारी टोळीचे म्होरके त्यांना कामाला लावत आहे. पैशाची लालूच, गाड्या-घोड्या, गरज पडल्यास व्यसन या पाशातून अल्पवयीनांना ग़ुन्हेगारी वर्तुळात ओढले जाते. नंतर हवा तसा त्याचा वापर होतो. अवैध सावकारीच्या पैशातून या मुलांना एक ते दीड टक्का रक्कम वसुलीसाठी दिली जाते. त्यावरच अल्पवयीनांची आक्रमकता वापरुन दहशत निर्माण केली जात आहे.व्याजाच्या टक्केवारीची चलतीगुन्हेगारी वर्तुळात पाठबळ असलेल्यांची चलती आहे. त्यांच्याकडे पोलीस फिरकतही नाही. यामुळेच घरी दरबार भरवून मोठमोठे डिलिंग केले जात आहे. खात्यातील शाखेची वसुली नसेल त्यापेक्षा अधिक वसुली या दरबारात नित्यनेमाने येत आहे. कोळसा, अवैध दारू, सट्टा आणि बाजारपेठेतून मोठ्या रकमा गोळा केल्या जात आहे. एका बैठकीला आठ ते दहा लाखांचे डिलिंग होते. पदरी असलेल्या अल्पवयीनांना पाठवून भाईने बुलाया है, असा संदेश दिला जातो. नंतर दरबार भरवून हप्ता वसुली होते. जीवाच्या धाकाने याला सर्वच भीक घालतात.अशा झाल्या झडपीनुकतेच लोहारा येथे दोन गट आपसात भिडले, छोटी गुजरी परिसरातील अल्पवयीन म्होरक्याने लोहाऱ्यात एकावर हल्ला केला होता. त्यानंतर लोहाºयातीलच पारंपरिक टोळ््यामध्ये धुमश्चक्री उडाली. जामनकरनगर परिसरात सातत्याने संघर्ष पेटत आहे. जुन्या फळीतील पंटर आता सक्रीय झाले असून त्यांच्याही हालचाली वाढल्या आहेत. सर्व टोळ््यामध्ये किमान ५० च्या घरात किशोरवयीन सक्रिय आहेत.रक्तरंजित संघर्षाची स्थितीमंडी टोळीतही अंतर्गत गट तयार झाले आहे. या टोळीत इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. हत्याकांडासाठी एकत्र आलेल्यांमध्ये संघर्षाची चिन्हे आहे. आर्थिक लाभासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. मात्र मुख्य व्यक्ती आलेला माल डब्यात टाकत असल्याने इतरांवर उपासमारीची वेळ आहे. वडगावात भाषिक मुद्दा करून संघटन सुरू आहे. नव्याने व्यूहरचना आखली जात आहे. अमरावतीत डेरेदाखल असलेल्या दोन भावांनी आठवडी बाजारात परतण्याची तयारी सुरू केली आहे.गुन्ह्यात अडकविण्यासाठी दोन लाखप्रतिस्पर्धी टोळीतील टार्गेटला गुन्ह्यात अडकविण्यासाठी मोठी रक्कम दिली जाते. कधी काळी मुंबईत एन्काऊंटरच्या बाबतीत होणारे आरोप आता यवतमाळातही होताना दिसत आहे. नुकत्याच एका गुन्ह्यात दोन लाख घेऊन एकाला अडकविण्यात आले होते. नंतर फिर्यादीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. तसेच बाजीराव चालविण्यासाठीही डिलिंग झाल्याची चर्चा आहे.यवतमाळातील सक्रीय टोळ्याग्रुपच्या नावाने शहराच्या विविध भागात टोळ्या तयार झाल्या आहेत. यामध्ये आठवडी बाजार व मोठे वडगाव असे दोन पूरक गट आहे. एक ग्रुप अमरावतीत आश्रयाला असलेल्या दोन भावाशी संलग्न आहे. बांगरनगर परिसरात बिच्चू गँग आकाराला आली आहे. त्याशिवाय तलावफैल व पाटीपुरा येथेही दोन गट सक्रिय आहेत. यापैकी एका गटाला नुकतीच शिक्षा झाल्याने विरोधी गट आक्रमक बनला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी