दहा डीजे मालकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:40 IST2017-09-06T23:40:26+5:302017-09-06T23:40:40+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्धारित डेसीबलपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी (डीजे) वाजवून ध्वनी प्रदूषण करणाºया दहा डीजे मालकांसह गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा डीजे मालकांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गणेश विसर्जन मिरवणुकीत निर्धारित डेसीबलपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी (डीजे) वाजवून ध्वनी प्रदूषण करणाºया दहा डीजे मालकांसह गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील बोरी व श्रीरामपूर येथील मंडळांचा यात समावेश असून या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
येथील डुबेवार ले-आऊटमधील चिंतामणी गणेश मंडळाच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी आवाजाची मर्यादा ओलांडून डीजे वाजविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव यांनी कारवाई केली. अधिक चौकशी केली असता सदर मंडळाजवळ मिरवणुकीची आणि डीजे मालकाजवळ डीजे वाजविण्याची परवानगी नसल्याचे आढळून आले. तसेच तालुक्यातील बोरगडी व श्रीरामपूर येथील काही मंडळांवर अशाच प्रकारे विनापरवानगी डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याबाबतची कारवाई करण्यात आली.
पोलीस प्रशासनाच्या सूचनेचे पालन न करता विनापरवाना डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाºया तब्बल दहा गणेश मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालक व वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे एपीआय धीरज चव्हाण यांनी केली आहे. पुसद शहरात यावर्षी अनेक मंडळांनी डीजेमुक्त मिरवणुका काढून आदर्श निर्माण केला. परंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शहरालगतच्या ग्रामीण भागातील काही मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण केले. या कारवाईमुळे डीजे मालक आणि वाहनचालकांत खळबळ उडाली आहेत.