शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

प्रेम झाले बदनाम; जिल्ह्यातील अजब-गजब प्रेमविरांनी वर्षभर पोलिसांना पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 14:52 IST

सोमवारी जगभरात ‘प्रेम दिवस’ साजरा होत असताना जिल्ह्यात प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या गुन्ह्यांचा हा संक्षिप्त तपशील...

ठळक मुद्देकुठे एकतर्फी प्रेमातून छेडछाड तर कुठे विवाहबाह्य संबंधातून खून, नातेही काळवंडले

अविनाश साबापुरे

यवतमाळ : प्रेम दोन व्यक्तींना जवळ आणते. त्यातून भांडणतंटे मिटतात, वैर संपते. मात्र, प्रेमाचे गैरअर्थ काढून अनेकजण प्रेमाच्याच नावाखाली गुन्हे करू लागले आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणातून वाढलेल्या वादावादीने गेले वर्षभर पोलिसांना इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास बाजूला ठेवून अशा अजब-गजब प्रेमविरांच्या मागे पळत राहावे लागले. कुठे एकतर्फी प्रेमातून छेडछाड तर कुठे विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून थेट खुनापर्यंत वाद पोहोचले. सोमवारी जगभरात ‘प्रेम दिवस’ साजरा होत असताना जिल्ह्यात प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या गुन्ह्यांचा हा संक्षिप्त तपशील...

घाटंजीच्या तरुणीची तेलंगणातून छेडछाड

तरुणांना हाती मोबाईल येताच आवडत्या तरुणीपर्यंत पोहोचणे सोपे वाटू लागले आहे. त्यातूनच घाटंजी येथील एका महाविद्यालयीन युवतीला चक्क तेलंगणातील तरुणाने एकतर्फी प्रेमातून ऑनलाईन प्रस्ताव पाठविला. गंमत म्हणजे, शेजारी राहणाऱ्या म्हातारीचा मोबाईल त्यासाठी वापरला. जवळपास पाच-सहा महिने त्या तरुणाची ऑनलाईन छेडखानी सहन केल्यानंतर घाटंजी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. थेट आदिलाबादमध्ये पोहोचून त्या उनाड तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

वाशिममध्ये घर, पुण्यात प्रेम अन् दिग्रसमध्ये खून

वाशिम जिल्ह्यात लग्न होऊन आलेल्या तरुणीला पुण्यात नोकरी मिळाली. घराबाहेर राहताना विवाहापूर्वीचे प्रेमप्रकरण उफाळून आले. त्यातूनच नवरा-बायकोची फारकतही झाली. मात्र, प्रेम आणि विवाहबाह्य प्रेमाचा संघर्ष उडाला. या विवाहितेला नियोजनपूर्वक दिग्रसमध्ये बोलावून तिचा निर्घृण खून करण्यात आला. तब्बल आठ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. तर १५ दिवस तपास केल्यानंतर मारेकरी नवरा अडकला.

प्रेमाच्या नावाने शिक्षकाने खाल्ला मार

यवतमाळ तालुक्यातील एका शाळेत वयस्क शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रेमाच्या नावाने नादी लावले. प्रेम कसले? शोषण केले. याची कुणकूण गावकऱ्यांना लागताच त्यांनी भरवर्गातच या जोडप्याला नको त्या अवस्थेत पकडले. शिक्षकाला बदडून काढले. विद्यार्थिनी ज्याला प्रेम समजत होती तो शिक्षकासाठी केवळ एक खेळ होता. त्याचा अंत वाईट झाला. गुरुजी सध्या निलंबित आहे. मात्र, या प्रकरणाने गुरू-शिष्यातील निखळ प्रेमाला वासनेचा वाईट रंग आला.

कमी वयात प्रेम जडले, प्रशासनाचे दंडुके पडले

गावखेड्यात नकळत्या वयात अनेकजण प्रेमात पडून नको त्या गोष्टी करून बसतात. अशा एका प्रेमवीर जोडप्याचे घरच्या मंडळींनी लग्न ठरवले. मात्र, बालविवाह प्रतिबंध कायदा आडवा आला आणि तहसील प्रशासनाने भर मांडवात पोहोचून लग्न वऱ्हाड्यांचीच धुलाई केली. आधी नेर तालुक्यात ठरलेला हा विवाह लपून-छपून घाटंजी तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. तोही उधळला गेला.

पैशासाठी मुलाने मुलगी बनून केले प्रेमाचे नाटक

प्रेमाचा बनाव करून एका तरुणाने चक्क आपण सुंदर तरुणी असल्याचे साेंग घेतले. यवतमाळातील या तरुणाने दिल्लीतील श्रीमंत डाॅक्टरला मुलीच्या आवाजात फोन करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वत:वरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी या नकली ‘तरुणी’ने डाॅक्टरकडून चक्क दोन कोटी रुपये उकळले. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला, त्यावेळी आरोपी तरुणी नसून, धडधाकट तरुण असल्याचे कळताच सर्वांची बोबडी वळली.

जिना मरना तेरे संग

प्रेम कुणावरही आणि कशावरही करता येते. अनेक तरुणांनी प्रेमाच्या नावाखाली गैरप्रकार केले असले तरी अनेकांना प्रेमाचा खरा अर्थही उमगला आहे. महागावच्या फुलसावंगीमधील शेख इस्माईल शेख इब्राहीम या तरुणाने आपल्या संशोधनावर जीवापाड प्रेम केले. शिक्षण कमी असतानाही उपजत संशोधक वृत्तीतून त्याने हेलिकाॅप्टर साकारले. दिवस-रात्र तहान-भूक विसरून तो या संशोधनात गुंतला होता. त्याचे हे हेलिकाॅप्टर प्रेम पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले होते. मात्र, संशोधन पूर्णत्वास येता येता हेलिकाॅप्टरचा अपघात होऊन त्यातच शेख इस्माईलचा मृत्यू झाला. स्वत:च्या छंदावर जीवापाड प्रेम करणारा शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना अन्य तरुणांसाठी प्रेरक उदाहरण आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेPoliceपोलिस