गणेशोत्सवातील शांततेचे श्रेय पोलिसांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:04 IST2017-09-09T22:04:03+5:302017-09-09T22:04:24+5:30

थेट पोलीस महासंचालक कार्यालयाचे लक्ष असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पार पडला. त्याचे श्रेय पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त, प्रचंड परिश्रम आणि नागरिकांच्या संयमाला दिले जात आहे.

The credit for the peace of Ganeshotsav | गणेशोत्सवातील शांततेचे श्रेय पोलिसांना

गणेशोत्सवातील शांततेचे श्रेय पोलिसांना

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था अबाधित : मंडळाचे कार्यकर्ते, नागरिकांचे सहकार्यही ठरले महत्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : थेट पोलीस महासंचालक कार्यालयाचे लक्ष असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पार पडला. त्याचे श्रेय पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त, प्रचंड परिश्रम आणि नागरिकांच्या संयमाला दिले जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील काही तालुके पोलीस दप्तरी संवेदनशील व अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहेत. काही गावांचाही त्यात समावेश आहे. सण-उत्सव काळात या तालुका मुख्यालय व गावांवर पोलीस प्रशासनाचा सर्वाधिक फोकस राहतो. गेल्या वर्षी उमरखेड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने उत्सवाला गालबोट लागले होते. हवेत गोळीबार करून पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाचे सर्वाधिक लक्ष यवतमाळ जिल्हा आणि त्यातही पुसद विभाग, उमरखेड तालुक्यावर होते. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान तत्कालिन जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यावर होते. आपल्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाºयांच्या सहकार्याने त्यांनी ते यशस्वीरित्या पारही पाडले. गणेश स्थापना व विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्य गुप्तवार्ता विभाग, जिल्हा विशेष शाखा आणि पोलीस ठाण्याची खुफिया यंत्रणा प्रचंड सक्रिय होती. अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनीसुुद्धा वेळोवेळी जिल्ह्यात भेटी देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. गणेशोत्सवातील शांततेसाठी लोकसहभाग, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे पोलिसांना प्रचंड सहकार्य लाभले. त्यांच्या संयमालासुद्धा या शांततेचे श्रेय दिले जात आहे.
संपूर्ण गणेशोत्सव कुठेही गालबोट न लागता शांततेत पार पडल्याचा आनंद जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आणि त्यांच्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाºयांच्या चेहºयावरून झळकताना पाहायला मिळाला. म्हणूनच बंदोबस्ताचा क्षीण घालविण्यासाठी आपल्या सहकाºयांना एकाचवेळी थिएटरमध्ये नेवून चित्रपट दाखविण्याचा अभिनव प्रयोग एसपींनी राबविला. त्या प्रयोगाचे पोलीस यंत्रणेतून ‘जिल्ह्यात पहिल्यांदाच’ म्हणून कौतुक होताना पाहायला मिळते.

आता आव्हान दुर्गोत्सवाचे
देशात दुसºया क्रमांकाचा दुर्गोत्सव मंडळ यवतमाळची ओळख आहे. दुर्गोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडणाºया पोलीस यंत्रणेपुढे लवकरच दुर्गोत्सवाचे आव्हान उभे राहणार आहे. मात्र, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिकांचे सहकार्य तसेच तगडा बंदोबस्त, परिश्रमाच्या बळावर दुर्गोत्सवही शांततेत पार पाडू, असा विश्वास पोलीस यंत्रणेतून व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या तुलनेत दुर्गोत्सवाचे जिल्ह्यातील स्वरूप प्रचंड मोठे असल्याने एम. राज कुमार यांच्या नेतृत्वात पोलिसांना आणखी व्यापकदृष्ट्या तयारी करावी लागणार आहे.
 

Web Title: The credit for the peace of Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.