कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:00:11+5:30
जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे.

कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पेरण्या तोंडावर असताना कापूस, तूर आणि हरभऱ्याचे चुकारे अडकले आहेत. अशा स्थितीत पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ चुकारे मिळावे याकरिता संपूर्ण शेतमाल गोदामात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासकीय संकलन केंद्रावर खरेदी झालेला शेतमाल ठेवण्यासाठी धामणगावचे गोदाम उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवला जाणार आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याचे पैसे वळते होणार आहेत.
जिल्हा प्रशासनाला खरेदीकरिता उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हरभऱ्याकरिता ५० हजार क्विंटचले उद्दिष्ट होते. शासकीय केंद्रावर ५६ हजार क्ंिवटल हरभऱ्याची खरेदी झाली. निर्धारित उद्दिष्टाच्या १२० टक्के हरभऱ्याची अधिक खरेदी करण्यात आली. जिल्ह्याला दीड लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात एक लाख ४७ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.
यानंतरही तूर आणि हरभऱ्याची नोंदणी करणारे ४२ हजार शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १२ हजार हरभरा उत्पादक आणि ३० हजार तूर उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या शेतकऱ्यांनाही आपल्या शेतमालाची विक्री हमी कें द्रावर करायची आहे.
२१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूस
जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांकडे साडेचार लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी कापसाची विक्री करायची आहे. प्रत्यक्षात केंद्रामध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे खरेदीला विलंब लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील शेतकºयांचा कापूस शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये तशी ग्वाही दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ