शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
5
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
6
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
7
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
8
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
9
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
10
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
11
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
12
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
13
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
14
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
15
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
16
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
17
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
18
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
19
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
20
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

कापूस घोटाळा, बियाणे टंचाईवर जिल्हाधिकाऱ्यांचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

सीसीआयचे प्रकरण मुंबईतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल, तर सोयाबीनचे प्रकरण राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सीसीआयने या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली, शिवाय जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सीसीआयचे अकोला येथील महाव्यवस्थापक अजय कुमार यांना अहवाल मागितला आहे

ठळक मुद्देआज ठरणार चौकशीची दिशा : १६ ही तालुका कृषी अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वत्र गाजत असलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवरील घोटाळा, सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई व जादा दराने विक्री या मुद्यांवर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी फोकस निर्माण केला आहे. या अनुषंगाने सोमवारी जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुका कृषी अधिकाºयांची आढावा बैठक बोलविण्यात आली आहे.‘लोकमत’ने सीसीआयमधील कापूस घोटाळा, सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई उघडकीस आणली. सीसीआयचे प्रकरण मुंबईतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल, तर सोयाबीनचे प्रकरण राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सीसीआयने या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली, शिवाय जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सीसीआयचे अकोला येथील महाव्यवस्थापक अजय कुमार यांना अहवाल मागितला आहे. तर सोयाबीन बियाण्यांची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्याकडे सोपविली गेली आहे.या दोन्ही प्रकरणांवर जिल्हाधिकाऱ्यांचा स्वत: वॉच आहे. सोमवारी सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तालुक्यात सीसीआय खरेदी केंद्र आणि सोयाबीन बियाणे टंचाईबाबत नेमकी काय स्थिती आहे, हे जाणून घेतले जाणार आहे. बैठकीनंतरच सोयाबीन कृत्रिम टंचाईच्या चौकशीची दिशा निश्चित होणार असल्याची माहिती आहे.गोदामातील रुई गाठींचे वजन तपासासीसीआय व पणन महासंघामार्फत राज्यभरातच कापसाची खरेदी सुरू आहे. सीसीआय व पणनच्या ग्रेडर्सची जिनिंग प्रेसिंग मालकांशी मिलीभगत आहे. अनेक ठिकाणी एका ग्रेडरकडे तीन ते चार केंद्रांचा प्रभार आहे. त्यामुळे बहुतांश कारभार जिनिंगच्या सोयीनेच चालतो आहे. खरेदी केलेल्या कापसापासून तयार रुई गाठींच्या वजनात घोळ आहे. प्रत्येक गाठीचे वजन कागदावर जास्त दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात ते कितीतरी कमी आहे. गोदामात असलेल्या गाठींचा पुन्हा काटा केल्यास यातील घोटाळा सिद्ध होईल. १६५ किलोच्या एका गाठमध्ये ४० हजार रुपयांच्या रुईची मार्जीन ठेवली जात आहे. ही मार्जीन ग्रेडर व जिनिंग मालकांच्या खिशात जात आहे. कमी दाखविलेले वजन भविष्यात वातावरणामुळे आलेली घट म्हणून अ‍ॅडजेस्ट केले जाणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येकच जिनिंगमध्ये दीड ते दोन कोटींची ‘मार्जीन’ ग्रेडरच्या संगनमताने अ‍ॅडजेस्ट केली जात आहे.

टॅग्स :cottonकापूसcollectorजिल्हाधिकारी