CoronaVirus News : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू ; 59 जण नव्याने पॉझेटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 18:15 IST2020-10-19T18:14:45+5:302020-10-19T18:15:15+5:30
CoronaVirus News: मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 60 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

CoronaVirus News : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू ; 59 जण नव्याने पॉझेटिव्ह!
यवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासांत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर 59 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 60 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, गत 24 तासांत एकूण 381 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 59 नव्याने पॉझेटिव्ह तर 322 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 530 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9523 झाली आहे. आज (दि.19) 39 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8544 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 305 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 85476 नमुने पाठविले असून यापैकी 84858 प्राप्त तर 618 अप्राप्त आहेत. तसेच 75335 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.