coronavirus : बाजार समिती कर्मचाऱ्याची नेर येथे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:20 IST2020-04-21T21:19:37+5:302020-04-21T21:20:12+5:30
सहा महिन्यांपूर्वी दारव्हा रोडवर एका अपघातातून बचावल्यानंतर सदर तरुण वैफल्यग्रस्त होता.

coronavirus : बाजार समिती कर्मचाऱ्याची नेर येथे आत्महत्या
यवतमाळ - नेर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील २६ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. शुभम रघुनाथ गावंडे, असे त्याचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. शुभम हा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत होता. शुभमने यापूर्वी गळ्यावर चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
सहा महिन्यांपूर्वी दारव्हा रोडवर एका अपघातातून बचावल्यानंतर शुभम वैफल्यग्रस्त होता. तेथून काही दिवसानंतर त्याने चाकू मारून घेतल्याचा प्रकार घडला. यातून तो बचावला.
१६ एप्रिल रोजी शुभमच्या बहिणीचा विवाह झाला. १९ एप्रिल रोजी त्याचे आई, वडील बाहेरगावी गेले. मंगळवारी ते गावात आले. आतून बंद असलेला घराचा दरवाजा तोडून पाहिले असता शुभम गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. दुर्गंधी सुटली असल्याने त्याने दोन दिवसांपूर्वी गळफास लावला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.