शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

coronavirus: कोरोना योद्ध्यांना रसद पुरविणारा आगळा सैनिक, पोलिसांना देतात रोज चहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 20:48 IST

२४ तास पहारा देणा-या पोलिसांना ते जागच्या जागी चहा पाजतात. चहाही असा तसा नाही... रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा! पण चहा पाजतो म्हणजे हा काही ऐरागैरा नथ्थु खैरा आहे, असेही मानण्याचे कारण नाही.

यवतमाळ - प्रत्यक्ष लढाई करणे शक्य नाही, त्यांनी सैनिकांना रसद पोचवावी, तीही देशभक्तीच आहे... हाच मंत्र कोरोना युद्धातही अनेकांनी अंगीकारला. त्यातलेच एक आहेत, प्रफुल्ल वसंतराव सूर्यतळ!काय करतात ते? २४ तास पहारा देणा-या पोलिसांना ते जागच्या जागी चहा पाजतात. चहाही असा तसा नाही... रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा! पण चहा पाजतो म्हणजे हा काही ऐरागैरा नथ्थु खैरा आहे, असेही मानण्याचे कारण नाही. चांगल्या फार्मासिटीकल कंपनीत बिझनेस एक्झीकेटिव्ह म्हनून उत्तम नोकरी आहे. तर त्यांची पत्नी उज्ज्वला वाहूरवाघ सूर्यतळ याही ग्रामीण पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत.

मग त्यांना का वाटावासा वाटला चहा?..त्यांना तसे वाटण्याचे कारण आहे त्यांच्या मनात दडलेली समाजशील भावना. कोरोनामुळे यवतमाळात मार्चमध्ये लॉकडाऊन झाले. पोलिसांच्या चौका-चौकात ड्युट्या लागल्या. तासन्तास ते एका ठिकाणी पहारा देत उभे. तहान-भूक विस्मरून लोकांना कोरोनामुक्त ठेवण्याचा त्यांचा आटापिटा त्यांनाही थकवून टाकत होता. अशावेळी तेही विषाणूचा बळी ठरण्याची शक्यता होती. म्हणून लॉकडाऊनच्या काळात घरीच असलेले प्रफुल्ल सूर्यतळ या पोलिसांना जागच्या जागी चहा पोहचवू लागले. ते दररोज स्वखर्चाने ८० ते ९० कप चहा स्वत: बनवून स्वत:च्या गाडीने शहरात फिरून पोलिसांना वाटतात. स्वत:च्या हाताने प्रेमाने कप भरून देतात. कप देताना हातांचा स्पर्श होणार नाही, याची आवर्जुन काळजीही घेतात. आर्णी नाका, वडगाव शोरूम चौक, दाते कॉलेज चौक, दत्त चौक, बसस्थानक चौक, सीआरओ, ट्रॅफिक ब्रँच हेडक्वार्टर, जूजू चौक, जिल्हा कारागृहापुढील परिसर, वडगाव पोलीस स्टेशन असे जेथे-जेथे पोलिसांचे पॉर्इंट असतात, तेथे-तेथे जाऊन सूर्यतळ पोलिसांना चहा देतात. मार्च महिन्यात सुरू केलेला हा उपक्रम आजही अव्याहत सुरू आहे. यात त्यांचे दरदिवशी साधारण तीन-चारशे रुपये खर्च होत असतील. पण त्यांना विचारले तर म्हणाले, ‘मी खर्च मोजलाच नाही भाऊ!’असा आहे आरोग्यवर्धक चहासूर्यतळ म्हणतात, हा ब्लॅक लेमन टी आहे. यात मिरे, लवंग, सुंठ, तुळशीची पाने, हळद आणि लिंबू वापरले जाते. त्यातून क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते.  त्याने गळाही मोकळा होतो. डॉक्टरांच्या मते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी व्हीटॅमिन सी गरजेचे आहे. या चहाचे आता पोलीसही चाहते झाले आहेत. प्रफुल्ल सूर्यतळ यांच्या उपक्रमाची खबर खुद्द पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यापर्यंतही आता पोहोचली आहे.पत्नीची सूचना सर आंखोंपर!प्रफुल्ल सूर्यतळ यांच्या पत्नी उज्ज्वला वाहूरवाघ-सूर्यतळ या ग्रामीण पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल आहेत. त्यांना पोलिसांच्या ड्युटीतील कष्टाची पुरेपूर कल्पना आहे. एका प्रफुल्ल यांनी दाते कॉलेज परिसरातील एका दवाखान्यात नातेवाईकासाठी चहा घेऊन गेले, त्याच चौकात पोलिसांची ड्युटी होती. त्यांनाही चहा द्यायलाच पाहिजे, असे उज्ज्वला यांनी सांगितले अन् तेथूनच सुरू झाला पोलिसांना चहाची रसद पुरविण्याचा सिलसिला. उमरसरा रोडवरील स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील सूर्यतळ यांच्या फ्लॅटमधून शहरभर चहा फिरू लागला. मग काही लोक जुळत गेले. वाघापुरातील त्यांचा मित्र महेश बगाडे त्यांच्यासोबत फिरत पोलीस ठाण्यात कधी कधी निर्जंतुकीकरण फवारणी करायचा. तर डॉ. अरुण जनबंधू, डॉ. प्रशांत तामगाडगे, नरेश कोटेचा यांनीही मदत केल्याचे सूर्यतळ सांगतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ