‘झेडपी’त कोरोनाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:02+5:30
जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांनाही कोरोनाने घेरले होते. सुदैवाने या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील जवळपास पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही कोरोनाची दहशत निर्माण झाली होती.

‘झेडपी’त कोरोनाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे अद्याप जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूत कोरोनाची दहशत कायम असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय काही अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांनाही कोरोनाने घेरले होते. सुदैवाने या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील जवळपास पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही कोरोनाची दहशत निर्माण झाली होती.
कोरोनामुळे कर्मचारी संघटनांनी अभ्यागतांना प्रशासकीय वास्तूत प्रवेशबंदी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ही समस्या तीव्रतेने जाणवली. परिणामी प्रशासकीय वास्तूच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनने तपासणी सुरू करण्यात आली. वास्तूत प्रवेश करणाऱ्यांच्या हातावर सॅनिटायझर मारणेही सुरू झाले होते. कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वच अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही धास्तावले होते. सध्या निम्म्या कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. दुसरीकडे कोरोनाच्या दहशतीने अभ्यागतांची गर्दीही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय वास्तूतील गर्दीला आळा बसला आहे. मात्र पुढील काही महिने सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.
२२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही लागण
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या तब्बल २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय ६७ आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली. यापैकी बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. तथापि डीएचओ ऑफिसमध्ये अद्यापही कोरोनाची दहशत कायम आहे. संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांवर जोर दिला जात आहे. या कार्यालयात प्रत्येक अभ्यागताचे नाव आणि मोबाईल क्रमांकही नोंदवून घेतला जात आहे.