कोरोनाच्या दहशतीने झरीतील अनेक गावे स्वत:हून झाली लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:04+5:30

कोरोनाबाधित महिलेवर सर्वप्रथम झरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी या ग्रामीण रुग्णालयाकडे एकही रुग्ण फिरकला नाही. महादापूर लगतच्या काही गावातील बाजारपेठ उघडलीच नाहीत, तर लोक आपापल्या घरात थांबून असल्याचे चित्र पहायला मिळाले. झरीतील बाजारपेठदेखील ठप्प होती.

Corona's terror led to the lockdown of many villages in Zari | कोरोनाच्या दहशतीने झरीतील अनेक गावे स्वत:हून झाली लॉकडाऊन

कोरोनाच्या दहशतीने झरीतील अनेक गावे स्वत:हून झाली लॉकडाऊन

Next
ठळक मुद्देपंचक्रोशीत भय। संपर्कात आलेल्यांना झरीच्या नगरपंचायतीत केले क्वारंटाइन

विठ्ठल पाईलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी : तालुक्यातील महादापूर येथील एका महिलेचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाल्याने झरीच्या पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी कोरोनाच्या भयाने लगतची अनेक गावे स्वत:हून लॉकडाऊन झाली. महादापूर गावात शुकशुकाट होता, झरीतील रस्तेदेखील ओस पडल्याचे दिसून आले.
कोरोनाबाधित महिलेवर सर्वप्रथम झरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी या ग्रामीण रुग्णालयाकडे एकही रुग्ण फिरकला नाही. महादापूर लगतच्या काही गावातील बाजारपेठ उघडलीच नाहीत, तर लोक आपापल्या घरात थांबून असल्याचे चित्र पहायला मिळाले. झरीतील बाजारपेठदेखील ठप्प होती.
दरम्यान, कोरोनाबधित महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या १६ जणांना झरी नगरपंचायतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले आहेत. दुर्दैवाने रुग्ण संख्या वाढली तर खबरदारी म्हणून संबंधितांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी बिरसाईपेठ येथील जिल्हा परिषद शाळा प्रशासनाने ताब्यात घेतली असून या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महादापूर गाव संपूर्ण सील करण्यात आले असून हे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या गावात ये-जा करता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ग्रामीण आणि दुर्गम भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. कारोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आता झरी तालुक्यातील ग्रामीण नागरिकही खबरदारी घेताना दिसून येत आहे.

Web Title: Corona's terror led to the lockdown of many villages in Zari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.