जिल्ह्यात कोरोना बळी 200

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:16+5:30

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मृतांमध्ये यवतमाळ श्हरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, वणी येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १७६ जणांमध्ये ११० पुरुष तर ६६ महिला आहेत.

Corona victims 200 in the district | जिल्ह्यात कोरोना बळी 200

जिल्ह्यात कोरोना बळी 200

googlenewsNext
ठळक मुद्देतिघांचा मृत्यू । १७६ नवे पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने धोक्याची पातळी गाठली आहे. सातत्याने पावणे दोनशे नवे पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे. तर दररोज मृत्यूचाही आकडा वाढत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तिघांचा कोरोनाने बळी घेतला. या ६० वर्ष वयोगटातील पुरुष व महिला तर ५४ वर्ष वयोगटातील एका पुरुषाचा समावेश आहे. कोरोना बळींचा आकडा हा दोनशेवर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मृतांमध्ये यवतमाळ श्हरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, वणी येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १७६ जणांमध्ये ११० पुरुष तर ६६ महिला आहेत. यवतमाळ ५४, पांढरकवडा २१, पुसद २०, उमरखेड १०, वणी ३१, आर्णी शहरात सात, बाभूळगाव तीन, दिग्रस पाच, कळंब आठ, महागाव दोन, नेर ११ असे नवे रुग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे एक हजार ४०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये ३२६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार ९३२ इतकी झाली आहे. यापैकी पाच हजार पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांंना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मेडिकलच्या आयसोलेशन वार्डमध्ये २८३ रुग्ण उपचार घेत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवातीपासून आतापर्यंत ६६ हजार २९७ नमुने तपासणीला पाठविले. या पैकी ६५ हजार १७० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ५८ हजार २३८ नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे. एक हजार १२७ नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. कोरोना चाचणीची गती वाढविण्यासाठी तीन खासगी लॅबलाही मान्यता दिली आहे.

खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी
शासनाच्या यंत्रणेव्यतिरिक्त खासगीतही कोरोना उपचार व तपासणीचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. यवतमाळातील तीन खासगी लॅबमध्ये कोरोनाचे रॅपिड टेस्ट करण्याला परवानगी दिली आहे. तर या लॅबमध्ये आरटीपीसीआर तपासणीसाठी संशयित रुग्णाचा स्वॅबही घेतला जातो. त्याचा अहवाल नागपूर येथून मागविण्यात येतो. ही सुविधा काही दिवसांपासून सुरु आहे.

Web Title: Corona victims 200 in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.