शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

१८ ते ४४ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लस मोहीम तात्पुरती थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

संपूर्ण जिल्ह्यात १७८ केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येते. दर दिवसाला २० हजार लसीची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी सरासरी दोन ते तीन हजार लस प्राप्त होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मोठा गोंधळ उडत आहे. यातून स्थानिक पातळीवरील यंत्रणेला रोषाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

ठळक मुद्देकेवळ दुसऱ्या डोससाठी मिळणार लस : ४९ हजार नागरिकांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात १९ लाख लसीची आवश्यकता असताना आतापर्यंत तीन लाख नागरिकांनाच लसीकरण करण्यात आले आहे. १६ लाख नागरिकांना लस मिळणे सध्या तरी दुरापास्त झाले आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तूर्त सर्वांनाच पहिल्या डोससाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिणामी १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात १७८ केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येते. दर दिवसाला २० हजार लसीची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी सरासरी दोन ते तीन हजार लस प्राप्त होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मोठा गोंधळ उडत आहे. यातून स्थानिक पातळीवरील यंत्रणेला रोषाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागत आहे. यातून परिस्थिती चिघळण्याचेच संकेत आहे. यामुळे आरोग्य मंत्र्यांनी मंगळवारी लसीची गती संथ करण्याचे संकेत दिले होते. सायंकाळी आरोग्य विभागाच्या सूचना जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या सूचनेमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची गती कमी करण्याच्या सूचना आहेत. त्यासोबतच ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. यातील अनेक नागरिकांचा दुसरा डोस संपण्यासाठी काही अवधीच बाकी आहे तर अनेकांना कालावधी संपल्यानंतरही लस मिळत नाही. यामुळे पुढील काळात लस देताना केवळ दुसऱ्या डोसमधील नागरिकांनाच लस देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना आहेत. यामुळे तूर्त दुसऱ्या डोसची मागणी असणाऱ्या नागरिकांनाच ही लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या डोससाठी काही काळ सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील ४९ हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची नितांत आवश्यकता आहे. यामध्ये अनेकांच्या डोसचा कालावधी संपला आहे. त्यामध्ये ३३ हजार नागरिक कोविशिल्डचे लाभार्थी आहेत तर १६ हजार नागरिक कोव्हॅक्सिनचे लाभार्थी आहेत. कोव्हॅक्सिनसाठी  २८ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. २८ दिवसानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना आहे. मात्र कालावधी संपल्यानंतरही डोस मिळत नसल्याने नागरिकांना आता नव्या सूचनेनुसार प्राधान्याने दुसरा डोस मिळणार आहे. त्याच प्रमाणे कोविशिल्डसाठी सहा ते आठ आठवड्याचा कालावधी निर्धारित केला आहे. या कालावधीत लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.  

ऑनलाईन नोंदणीला तूर्त ब्रेक - दहा केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी तयारी करण्यात आली होती. या वयोगटांसाठी लस उपलब्ध न झाल्याने काही काळासाठी या वयोगटातील नोंदणी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना काही काळ ऑनलाईन नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

१७ हजार डोस मिळणार - यवतमाळ जिल्ह्यासाठी लागणारी लस संपल्याने १७ हजार डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत ही लस जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यानंतर विविध केंद्रांवर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना ही लस मिळणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या