शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोरोनाने व्यापला संपूर्ण जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 5:00 AM

जूनपासून गेल्या सहा महिन्यांत रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात नियंत्रणात आली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये, तर सक्रिय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली होती. या कालावधीतील अनेक दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता जून २०२१ चीच परिस्थिती पुन्हा एकदा अवतरली आहे. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६७९पर्यंत पोहोचली आहे. मात्र या काळात तब्बल ८४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन वर्षे जिल्ह्याला जेरीस आणणारा कोरोना मध्यंतरी शांत झाला. मात्र २०२२चा जानेवारी उजाडताच कोरोनाने ‘कमबॅक’ केले आहे. अवघ्या १६ दिवसांत कोरोना विषाणूने जिल्ह्यातील सोळाही तालुके पुन्हा एकदा व्यापून टाकले आहे. सुरुवातीला केवळ यवतमाळ व आजूबाजूच्या परिसरात रुग्ण आढळत होते. मात्र आता उमरखेडपासून झरीजामणीपर्यंत सर्वच तालुक्यात संसर्ग कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला.अशी परिस्थिती जिल्ह्यात जून २०२१मध्ये यापूर्वी पहायला मिळाली होती. मात्र जूनपासून गेल्या सहा महिन्यांत रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात नियंत्रणात आली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये, तर सक्रिय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी झाली होती. या कालावधीतील अनेक दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र आता जून २०२१ चीच परिस्थिती पुन्हा एकदा अवतरली आहे. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६७९पर्यंत पोहोचली आहे. मात्र या काळात तब्बल ८४२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.  त्यातील ५३ जण परजिल्ह्यातील आहेत. 

यवतमाळ तिसऱ्यांदा हाॅटस्पाॅटच्या दिशेने  

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत  जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण यवतमाळ तालुका व शहरातच आढळले होते. आता तिसऱ्या लाटेतही सर्वाधिक रुग्ण यवतमाळमध्येच आढळत आहेत. जानेवारीच्या १६ दिवसांत आढळलेल्या ८४२ रुग्णांपैकी ३७८ रुग्ण एकट्या यवतमाळातील आहेत. त्या खालोखाल पुसद, पांढरकवडा आणि नेर तालुक्याचा क्रमांक लागतो. 

५३ पाहुण्यांनी केली गडबडजिल्ह्यात कोरोना वाढत असला तरी विविध समारंभांच्या निमित्ताने बाहेर जिल्ह्यातून पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. पंधरवड्यात तब्बल ५३ रुग्ण बाहेर जिल्ह्यातून आल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाहुण्यांनी कोरोना बाहेरून आणला की त्यांना यवतमाळात लागण झाली याचे ‘ट्रेसिंग’ आवश्यक आहे.

रविवारी पुन्हा आढळले १५७ नवे पाॅझिटिव्ह  - जिल्ह्यात रविवारी १६ जानेवारी रोजी आणखी १५७ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ६७९ झाली आहे. त्यातील ५७ रुग्ण रुग्णालयात तर ६२२ गृहविलगीकरणात आहेत. रविवारी प्रशासनाला प्राप्त झालेल्या ९५८ जणांच्या तपासणी अहवालांपैकी १५७ पाॅझिटिव्ह आणि ८०१ निगेटिव्ह आले.- या १५७ जणांमध्ये ५३ महिला व १०४ पुरुष आहेत. रविवारी आर्णीमध्ये चार, दिग्रस दहा, घाटंजी पाच, कळंब १७, मारेगाव एक, नेर २०, पांढरकवडा १६, पुसद सात, राळेगाव १६, वणी सात, यवतमाळ ४२ तर झरी जामणीत दोन रुग्ण आढळले. शिवाय रविवारचे दहा रुग्ण बाहेर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर ९.२१ तर मृत्यू दर २.४२ आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या