कोरोनाचा प्रहार शेतकऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:36+5:30

यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे. लग्नसराई ‘कॅश’ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने भाजीपाला व्यवसाय डबघाईस आला आहे. शिवारात भाजीपाला उभा असला तरी ग्राहक नाही. यामुळे शेतकºयांनी भाजीपाला तोडणेच थांबविले आहे. यातून भाजीपाल्याची गुणवत्ता घसरण्याचा धोका आहे. भाजीपाला तोडला तर मजुरीचेही पैसे निघत नाही.

Corona attacks farmers | कोरोनाचा प्रहार शेतकऱ्यांवर

कोरोनाचा प्रहार शेतकऱ्यांवर

ठळक मुद्देसण, उत्सव, विवाह समारंभ रद्द झाल्याने आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाळ्यात लग्नसराईमुळे भाजीपाल्याची मागणी अधिक असते. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण चित्रच उलटे झाले. लग्न, कार्यक्रम, उत्सव, यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे महाप्रसादही रद्द करावे लागले. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला. शेतात शेतमाल आहे, परंतु खरेदी करणारे ग्राहकच नाही.
यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे. लग्नसराई ‘कॅश’ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने भाजीपाला व्यवसाय डबघाईस आला आहे. शिवारात भाजीपाला उभा असला तरी ग्राहक नाही. यामुळे शेतकºयांनी भाजीपाला तोडणेच थांबविले आहे. यातून भाजीपाल्याची गुणवत्ता घसरण्याचा धोका आहे. भाजीपाला तोडला तर मजुरीचेही पैसे निघत नाही.
शेतशिवारात वांगे सडत आहेत. टमाट्यांचा सडा पडला आहे. मेथी कोमेजली गेली आहे. सांभार गवतात बुडाला आहे. ढेमस, भेंडीची गुणवत्ता घसरली आहे. कारले, काकडी, गवार, वाल या पिकांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. हा शेतमाल बाजारात नेल्यानंतर पडलेल्या दरात मागितला जातो. अनेक वेळा शेतमालाचा लिलावही होत नाही. अशावेळी विक्रीचा खर्च निघणेही अवघड होते.

वांगे पाच रुपये, तर टमाट्यांना मातीमोल भाव
बाजारात भाजीपाला आणण्यासाठी फवारणी करावी लागते. त्यासाठी शेतकºयांना पैसे मोजावे लागतात. शेतात राबणारे मजूर आणि सिंचनाचा खर्च वेगळा. ही संपूर्ण प्रक्रिया आटोपल्यावर वांगे उत्पादकांच्या हातात किलोमागे पाच रूपये पडत आहे. टमाटे तर बेभाव जात आहे. अशा स्थितीत भाजीपाला विकायचाच कशाला, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.
 
Web Title: Corona attacks farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.