शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले जिल्ह्यात आणखी तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ३२५ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी २५ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ३०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४४ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ५३० झाली आहे. 

ठळक मुद्दे२५ पाॅझिटिव्ह, २३ कोरोनामुक्त : मृतक यवतमाळ, झरी व दारव्हातील

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून रविवारी २५ नवे रुग्ण आढळले. तर तब्बल तीन जणांचा बळी गेला. कोरोनामुळे रविवारी दगावलेल्या तिघांमध्ये यवतमाळ शहरातील ५६ वर्षीय पुरुष, झरीजामणी येथील ४७ वर्षीय पुरुष आणि दारव्हा शहरातील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.दरम्यान रविवारी २३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ३२५ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी २५ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ३०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४४ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ५३० झाली आहे. तसेच रविवारी २३ कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ७८९ इतकी झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ३९७ जणांचा मृत्यू प्रशासनाने नोंदविला आहे.सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख २२ हजार २१० नमुने तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी १ लाख २१ हजार ५३७ अहवाल प्राप्त झाले. तर ६७३ अहवालांची प्रतीक्षा कायम आहे. तसेच १ लाख ९ हजार ७ जणांचे स्वॅब नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले.

एकूण बळीसंख्या चारशेच्या उंबरठ्यावर पोहोचली सुरुवातीच्या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोचा एकही बळी गेला नव्हता. मात्र नंतर झपाट्याने मृत्यूसंख्या वाढली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तर एकाच दिवशी पाच-पाच जणांचे मृत्यू नोंदविले गेले. मध्यंतरी रुग्णसंख्या आणि बळींचे प्रमाण काहीसे नियंत्रणात आले होते. मात्र आता पुन्हा रुग्ण आढळत आहे. रविवारी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३९७ पर्यंत पोहोचली आहे.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या