स्वयंपाकी, मदतनीसांचे धरणे
By Admin | Updated: June 21, 2017 00:30 IST2017-06-21T00:30:33+5:302017-06-21T00:30:33+5:30
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय पोषण आहार कर्मचारी, स्वयंपाकी व मदतनिसांनी

स्वयंपाकी, मदतनीसांचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय पोषण आहार कर्मचारी, स्वयंपाकी व मदतनिसांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी धरणे दिले.
यापूर्वी धरणे, मोर्चे, आंदोलन केले. तरीही मानधन वाढ झाली नाही. या प्रलंबित समस्यांसाठी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे धरणे देण्यात आले. मानधन व इंधन बील थेट स्वयंपाकी, मदतनीसांच्या खात्यात जमा करावे, खात्यात तीन हजार रूपये शिल्लक ठेवण्याची अट रद्द करावी, मानधन दरमहा नियमित द्यावे, कमी केलेल्या महिलांना कामावर परत घ्यावे, अतिरिक्त कामाचा जादा मोबदला द्यावा, रजा मंजूर करावी आदी मागण्या करण्यात आल्या. युनियनचे जिल्हाध्यक्ष दिवाकर नागपुरे, सचिव संगीता बांगडे, विजय ठाकरे, संजय भालेराव, ज्योती रत्नपारखी, मेहरबानो शेख, नलिनी क्षीरसागर, नंदा पारटकर आदींच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले.