शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मृदा मिनी लॅबवर धनदांडग्यांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 21:47 IST

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र या योजनांवर राजकीय पक्षासह शेतकरी नेत्यांनीच ताबा मिळविल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.

ठळक मुद्देदीड कोटींचे अनुदान : भाजपा नेते, शेतकरी आंदोलकच आघाडीवर

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र या योजनांवर राजकीय पक्षासह शेतकरी नेत्यांनीच ताबा मिळविल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. मृदा मिनी लॅब या महत्वाकांक्षी प्रकल्पाचेही असेच झाले आहे. जिल्ह्यातील ३० मिनी लॅबवर बहुद्देशीय संस्थांच्या नावाने राजकीय नेते व धनदांडग्यांनी ताबा मिळविला. यातून तब्बल एक कोटी ३५ लाख रुपयांचे अनुदान लाटले आहे.राष्टÑीय शाश्वत शेती योजना व मृदा आरोग्य व्यवस्थापन अंतर्गत मृदा परीक्षणासाठी मिनी लॅब ही योजना राबविण्यात आली. शेतकरी कुटुंबातील बेरोजगार युवकांच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला. शेतीचे आरोग्य तपासून नेमके कोणते अन्नद्रव्य कमी आहे, नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण जमिनीत किती आहे, याची शेतकºयांना माहिती मिळावी, त्यातून रासायनिक खतांचा वापर आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर किती करावा याची नेमकी माहिती मिळते. यासाठीच जिल्ह्यातील १६ तालुक्यांसाठी ३० मिनी लॅब मंजूर झाल्या. एक लाख तीन हजार रुपयांच्या या लॅबसाठी शासनाने ४५ हजार रुपयांचे अनुदान दिले. जिल्ह्यातील विविध बहुद्देशीय संस्थांच्या माध्यमातून या लॅब घेण्यात आल्या. आता वर्षभराचा कालावधी लोटला तरी बोटावर मोजण्याइतक्याच मिनी लॅब सुरू आहे.मात्र या लॅब मिळविताना राजकीय नेते, शेतकरी नेते आणि सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाºयांनी बहुद्देशीय संस्थांच्या नावावर या लॅब बळकावल्या. मिनी लॅब घेणाºयांमध्ये एका माजी राज्यमंत्र्यांची पत्नी, जिल्हा परिषदेचा माजी सभापती, बेरोजगारांच्या बहुद्देशीय संस्थेतील माफिया, मजूर सोसायटीचा म्होरक्या यासह सत्ताधारी पक्षातील अनेकांचा समावेश आहे. या मंडळींनी कोणतेही माती परीक्षण न करता शासकीय अनुदान लाटल्याचे आता पुढे येत आहे. या लॅब राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्याने कुणी त्यांच्यावर कारवाई करण्यासही पुढे येत नाही. विशेष म्हणजे शेतकºयांचा कैवार घेऊन रस्त्यावर उतरणारेही यात मागे नाही. मिनी कीट लॅबच्या एका छोट्या योजनेतही ही मंडळी संधी सोडत नसल्याचे दिसून येते. शेतकरी कुटुंबातील बेरोजगारासाठी असलेली ही योजना आता राजकीय पक्षांच्या दावणीला बांधली गेली आहे. शेतकºयांच्या उन्नतीसाठी असणाºया योजना राजकीय नेतेच आपल्या घशात घालत असतील तर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.हे आहेत १६ तालुक्यातील लाभार्थीवैशाली संजय देशमुख (दिग्रस), देवानंद पवार (घाटंजी), अमर दिनकर (यवतमाळ), योगीता देशमुख (यवतमाळ), मनमोहन भोयर (यवतमाळ), मनीष दवे (यवतमाळ), रवींद्र राऊत (दिग्रस), प्रवीण चहारे (यवतमाळ), अनिल संजय ठाकरे (यवतमाळ), ममता लक्ष्मण काळे (यवतमाळ), राजू वनकर (यवतमाळ) राजविजय राठोड (दिग्रस), ब्रह्मानंद मेघा चव्हाण (पुसद), विनोद उत्तमराव कोरडे (बाभूळगाव), रवींद्र गावंडे (यवतमाळ), वीरेंद्र ईश्वरसिंह चव्हाण (यवतमाळ), उदय आडे (घाटंजी), विजय विष्णू राठोड (पुसद), सुरेश देशमुख (पुसद), युवराज बक्सीराम चव्हाण (पुसद), शिवाजी तोरकड (पुसद), किरण आनंदराव बोडखे (पुसद), अनिल परसराम आडे (पुसद) अमोल मदन बोकिनपिल्लेवार (कळंब), प्रमोद मोतीराम राठोड (महागाव), संदीप सुधाकर शेंडेकर (यवतमाळ), पंकज विजय वानखडे (यवतमाळ), मंजू राहुल चचाने (यवतमाळ), जितेंद्रसिंग कोंघारेकर (पांढरकवडा).जिल्ह्यात ३० पैकी १२ मिनी लॅबमध्ये माती परीक्षणाचे काम केले जात आहे. उर्वरित लॅबधारकांकडून प्रतिसाद मिळत नाही. याच कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात दौरा करत आहे.- कैलास चव्हाणकेंद्रीय माती परीक्षण प्रयोगशाळा प्रमुख.