शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सतत धूर अन् धूळ; जगात होणाऱ्या तिसऱ्या आजाराचा जिवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:32 IST

Yavatmal : शेतात काम करणारे, कंपनीतील कामगार या सर्वांनाच घेतोय विळख्यात

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : फुफ्फुसाचा आजार ही जागतिक समस्या बनली आहे. धूळ आणि धुरीमुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. यासोबतच शेतशिवारात काम करणारा घटकही धूर आणि धुळीमुळे धोकादायक वातावरणात आहे. प्रत्येकानेच योग्य खबरदारी घेऊन या आजारापासून स्वतःची रक्षा करणे गरजेचे झाले आहे. 

सतत कंपनीमध्ये काम करणाऱ्यांनी मास्क वापरा, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, ग्रामीण भागात निर्धूर चुलीचा वापर करावा, शेतातील पिकांची मळणी, सोंगणी करतानाही खबरदारी घ्यावी. प्रदूषण, धूर आणि धूळ यामुळे फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत सतत बदल होत असतो. सुरुवातीला हा बदल जाणवत नाही. नंतर मात्र दम लागणे, वातावरण बदलाचा परिणाम होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. अशा स्थितीत फुफ्फुसाची ५० टक्के कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन तपासणी करत औषधोपचार घ्यावा, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. 

'सीओपीडी'ने जग हैराण ! फुफ्फुसाचा हा आजार आता जागतिक स्तरावर पसरला आहे. मोठे महानगर असो की, आडवळणावरचे गाव दोन्ही ठिकाणी धोका सारखाच आहे

सीओपीडी आजार कशामुळे होतो? सतत प्रदूषित हवा, धूर, धूळ आणि सिगारेट, बीडीचे व्यवसन या सर्वांमुळे सीओपीडी हा आजार होण्याची दाट शक्यता असते

संगणक तपासेल फुफ्फुसांची क्षमता पीएफटी म्हणजे कॉम्प्युटराइज पल्मनरी फंक्शनल टेस्ट केल्याने सीपीओडीचे निदान करता येते.

दुकानदार, विक्रेते, चालकांना धोका रस्त्यावर धूळ उडत असते. वाहनांचा धूर असतो. याचा परिणाम दुकानदार, विक्रेते व वाहनचालकांनाही होतो. त्यांनाही धोका कायम आहे.

चाळिशीनंतर फुफ्फुसं तपासा चाळिशीनंतर फुफ्फुसाची कार्यक्षमता कॉम्प्युटराइज पल्मनरी फंक्शनल टेस्टच्या माध्यमातून तपासणी आवश्यक आहे.

लक्षणं दिसताच करावी तपासणी "फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे लवकर जाणवत नाही. त्रास होतो, तेव्हा हा आजार तिसऱ्या स्टेजपर्यंत गेलेला असतो. थोडीही लक्षणं असल्यास तपासणी करून घ्यावी." - डॉ. रवींद्र राठोड, श्वसन रोग तज्ज्ञ

सिगारेट पिण्याइतका भयंकर, चिवट ! 

  • महिला ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करतात. कोंदट ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था असते. 
  • चुलीतून निघणारा धूर महिलांसाठी सिगारेट पिण्याइतकाच धोकादायक असतो. त्याचा परिणाम फुफ्फुसावर होत राहतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सpollutionप्रदूषणYavatmalयवतमाळ