शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये घरकुलांचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

पालिकेने लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल बांधकामाची मंजुरी दिली. लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. यात एक लाख राज्य शासन व दीड लाखाचे अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाते. पालिकेने लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकूल बांधकामास परवानगी दिली. पालिकेवर विश्वास ठेवून अनेकांनी आपले राहते घर तोडून नवीन बांधकामास सुरुवात केली. परिणामी अनेकांना किरायाने राहावे लागत आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून अनुदान नाही : लाभार्थ्यांसमोर पावसाळ्यात उभे ठाकले संकट

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पालिकेतर्फे अनेक लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून निधी न मिळाल्याने बांधकाम रखडले आहे. अनेक लाभार्थी बेघर झाले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.पालिकेने लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल बांधकामाची मंजुरी दिली. लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान देण्याची तरतूद आहे. यात एक लाख राज्य शासन व दीड लाखाचे अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाते. पालिकेने लाभार्थ्यांची निवड करून त्यांना घरकूल बांधकामास परवानगी दिली. पालिकेवर विश्वास ठेवून अनेकांनी आपले राहते घर तोडून नवीन बांधकामास सुरुवात केली. परिणामी अनेकांना किरायाने राहावे लागत आहे. काही लाभार्थी घरकूला शेजारीच तात्पुरती झोपडी उभारून वास्तव्य करीत आहे.उन्हाळ्यात रेती उपलब्ध झाली नाही. त्यातही विशिष्ट लाभार्थ्यांनाच अनुदानाचा ४० हजारांचा पहिला व दुसरा हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर अनुदान मिळणेही बंद झाले. परिणामी अनेकांनी उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम सुरू ठेवले. मात्र शासनाकडून निधी येत नसल्याने आता सर्वच लाभार्थी हवालदिल झाले आहे. त्यांच्यासमोर पावसाळ्यात राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाभार्थी पालिकेत चकरा मारून थकले आहे. मात्र निधी मिळणे दुरापास्त झाले आहे.पावसाळ्यात संपूर्ण लाभार्थ्यांवरच पावसात राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अनुदानाचे हप्ते मिळत नसल्याने पालिका प्रशासनही हवालदिल झाले आहे. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.लाभार्थ्यांचा आमरण उपोषणाचा इशाराबांधकामासाठी अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहे. ज्यांनी उसनवारी पैशातून बांधकाम केले त्यांच्यासमोर पैसे परत करण्याचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांनी १५ जुलैपासून पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. शे.लतिफ शे.कठालू, रूपाली सोमवंशी, मोमीनाबी शेख युनूस, अनिसाबी, प्रकाश सहातोंडे, मारोती कामाजी, रुखमाजी हांडेवार, शिवाजी लोखंडे, किशोर बरडे, पांडुरंग विभूते, रज्जाकभाई डवर, शेख निसार, वाजीद खान इब्राहीम खान, अयूब खान उस्मान खान, प्रताप देशमुख, शेषराव वाघमोरे, जगदीश सोमवंशी आदींनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.राज्य शासनाकडून प्राप्त निधीचे वाटप केले. आता निधी उपलब्ध नाही. ३० जूनपर्यंत निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.- निर्मला राशीनकर, मुख्याधिकारी