शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक लुटारूंच्या आंतरराज्यीय टोळीचे कनेक्शन यवतमाळात, पुसदमधून एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 14:51 IST

ट्रक चालक व वाहकाचा खून करून त्यातील लाखोंचा मुद्देमाल लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे यवतमाळ जिल्हा कनेक्शन पोलीस तपासात पुढे आले आहे.

यवतमाळ - ट्रक चालक व वाहकाचा खून करून त्यातील लाखोंचा मुद्देमाल लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे यवतमाळ जिल्हा कनेक्शन पोलीस तपासात पुढे आले आहे. या टोळीचे दोन सदस्य पुसद तालुक्यातील असून एकाला पोलिसांनी रविवारी अटक केली.

जितेंद्र उर्फ पिंटू किसन राठोड (४७) रा. कोपरा ह.मु. ग्रीन पार्क पुसद जि. यवतमाळ असे या आरोपीचे नाव आहे. त्याचा पुसदमधील साथीदार तुकाराम रामचंद्र राठोड याला यापूर्वीच मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. जितेंद्र उर्फ पिंटू हा सहा राज्यातील गुन्ह्यात सहभागी आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, तामिलनाडू आदी तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ट्रक चालक व वाहकाचा खून करणे, त्यांच्या अंगावरील कपडे काढून मृतदेह रेल्वे ट्रॅकवर अथवा जंगलात फेकणे, ट्रक व त्यातील माल लुटून नेणे, अशा स्वरूपाचे तब्बल २२ गुन्हे अलिकडच्या काळात दाखल आहेत. पुणे येथून निघालेला ट्रक मालासह गायब झाल्याचे प्रकरण नुकतेच मध्य प्रदेशातील मिसरोट पोलीस ठाण्यात नोंदविले गेले. लुटारूंच्या या टोळीचा प्रमुख आदेश गुलाबसिंग खांम्बरा रा. खिरीया मोहल्ला, मंडीदीप भोपाळ मध्यप्रदेश हा आहे. गुलाबसिंगसह त्याच्या टोळीतील सदस्य जयकरण प्रजापती रा. बारीगड जि. भोपाळ, तुकाराम रामचंद्र राठोड रा. कोपरा ता. पुसद जि. यवतमाळ या तिघांना अटक केली गेली. त्यांचा एक साथीदार जितेंद्र आपल्या गावाकडे (कोपरा ता. पुसद) येथे दडून असल्याची टीप मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी यवतमाळ एसपींना दिली. त्या आधारे यवतमाळ एलसीबीने जितेंद्रला रविवारी अटक केली. त्याला मिसराट पोलीस ठाण्याचे (भोपाळ) निरीक्षक संजीव चौकसे यांच्या ताब्यात देण्यात आले. 

पुसदचे दोघेही अट्टल गुन्हेगारलुटारूंच्या आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असलेले पुसद तालुक्यातील जितेंद्र व तुकाराम हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुसद शहर, वाशिम, जळगाव, औरंगाबाद येथे चोरीच्या ट्रकचे इंजीन नंबर व चेचीस नंबर बदलवून ट्रक विकल्याचे गुन्हे दाखल आहेत. 

नागपूर कारागृहात आला संपर्कजितेंद्र व तुकाराम २००९-१० मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांची ट्रक चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या आदेश खांम्बरा याच्याशी ओळख झाली. कारागृहातून सुटताच हे दोघेही त्या टोळीत सहभागी झाले. 

मोडस आॅप्रेन्डी : आधी पार्टी, नंतर लूटखांम्बरा टोळीने ट्रक लुटण्यासाठी गुन्ह्याची विशिष्ट पद्धत विकसित केली. या टोळीचे सदस्य वेगवेगळ्या मोठ्या ढाब्यांवर कोणत्याही ट्रक चालकाला तुझा माल विकून देतो असे आमिष द्यायचे, त्याला जेवणाची पार्टी द्यायचे, या दरम्यान ते जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायचे. चालक-वाहक झोपी जाताच त्यांना ट्रकसह जंगलात नेले जात होते. तेथे त्यांचा खून करून व प्रेताची विल्हेवाट लावून ट्रक पळवून नेला जात होता. या टोळीची ही गुन्ह्याची पद्धत (मोडस आॅप्रेन्डी) मध्यप्रदेश पोलिसांनी कथन केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र