दारव्हा येथे काँग्रेसची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST2021-08-19T04:45:45+5:302021-08-19T04:45:45+5:30

बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार डाॅ.वजाहत मिर्झा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक बोबडे उपस्थित होते. यावेळी डॉ.मिर्झा ...

Congress review meeting at Darwha | दारव्हा येथे काँग्रेसची आढावा बैठक

दारव्हा येथे काँग्रेसची आढावा बैठक

बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार डाॅ.वजाहत मिर्झा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक बोबडे उपस्थित होते. यावेळी डॉ.मिर्झा यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पक्षसंटन मजबूत करणे आवश्यक असून, वार्डनिहाय बुथ कमिट्या स्थापन कराव्यात, असे सांगितले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

राहुल ठाकरे, अशोक बोबडे, माजी नगराध्यक्ष सैय्यद फारूख यांनीही मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर कदम, विजय पाचकोर, गजानन बिबेकर, रमेश पचगाडे, रमेश आडे, प्रकाश देशकरी, प्रमोद लोंढे, अतुल राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे यांनी केले. संचालन गणेश म्हातारमारे, तर आभार रामधन जाधव यांनी मानले. बैठकीला ज्ञानेश्वर बोरकर, सिद्धार्थ गडपायले, मनमोहनसिंग चव्हाण, अमोल राठोड, अनिल जवळगावकर, राजेंद्र माहुरे, जाफर खान, जावेद अंन्सारी, राजेंद्र घाटे, दिलीप चौधरी, नाना ढोंगे, विजय पाचकोर, ज्ञानेश्वर खोडे, कैलास साबळे, सुभाष पवार, ज्ञानेश्वर कदम, गुलाब चव्हाण, गुलाब राठोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

180821\img-20210809-wa0006.jpg

बैठकीत मार्गदर्शन करतांना डॉ. मिर्झा सोबत राहुल ठाकरे, अशोक बोबडे आदी

Web Title: Congress review meeting at Darwha