साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:41 IST2019-01-11T13:40:40+5:302019-01-11T13:41:17+5:30
अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले.

साहित्यिकांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ यवतमाळात काँग्रेस कमिटीचे मूक आंदोलन
ठळक मुद्देतोंडाला काळ््या पट्ट्या बांधून केले मूक आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: अ.भा. संमेलनासाठी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावात नाकारण्यात आले. ही साहित्यिकांची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने म. ज्योतिबा फुले पुतळ््याजवळ शुक्रवारी सकाळी मूक धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी, यवतमाळ महिला जिल्हा काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस, एनएसयुआय, जिल्हा काँग्रेस सेवादल, कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले.