दारव्हा येथे निर्यातबंदीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:00 AM2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:24+5:30

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. आधीच कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली.

Congress agitation against export ban at Darwha | दारव्हा येथे निर्यातबंदीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

दारव्हा येथे निर्यातबंदीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

Next
ठळक मुद्देएसडीओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन : केंद्र सरकारचा निषेध, बंदी उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीविरुद्ध येथे तालुका काँग्रेसतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. आधीच कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली. शेती व्यवसायावरही मोठा परिणाम झाला. त्यात कांदा निर्यात बंद झाल्याने कांद्याचे भाव पडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
निर्यात बंदी त्वरित उठविण्या यावी. अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी नगराध्यक्ष सै.फारुक सै.करिम, सर्फराज खान, जमन काझी, विजय गोकुळे, कैलास साबळे, सतीश बागल, प्रवीण काजळे, अशोक देशमुख, महेमूद अली, अरुण नांदेकर, ओंकार मनवर, साहेबराव जवके, अनंत कोल्हे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress agitation against export ban at Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.