शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 22:02 IST

रविवारी जिल्ह्याला १७ हजार २०० लसींचा डोस प्राप्त झाला. त्यामध्ये १२ हजार कोविशिल्ड तर पाच हजार २०० कोव्हॅक्सिन लसीचा डोस आहे. पहिल्या टप्प्यात अनेकांनी कोविशिल्डची लस घेतली आहे. आता त्यांचा दुसरा डोस घेण्याचा अवधी जवळ आला आहे. काहींचा हा अवधी लोटूनही गेला आहे.

ठळक मुद्देअल्प पुरवठा : वारंवार बदलले जाते नियोजन, नागरिकांच्या उत्साहावर पडतेय विरजण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना लसीकरणाला लसींचा तुटवडाच सर्वांत मोठा अडसर ठरत आहे. सुरुवातीला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र स्वत:हून नागरिक लसीकरण केंद्रांवर येत आहे. त्यांना देण्यासाठी पुरेशी लस उपलब्ध नाही. त्यातच आता कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन असा गोंधळ उडत आहे. जिल्ह्यात जवळपास १ लाख ८२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामध्ये ९० हजार ग्रामीण भागातील नागरिक आहेत. लस अपुरी पडत असल्याने वारंवार नियोजन बदलावे लागत आहेत. रविवारी जिल्ह्याला १७ हजार २०० लसींचा डोस प्राप्त झाला. त्यामध्ये १२ हजार कोविशिल्ड तर पाच हजार २०० कोव्हॅक्सिन लसीचा डोस आहे. पहिल्या टप्प्यात अनेकांनी कोविशिल्डची लस घेतली आहे. आता त्यांचा दुसरा डोस घेण्याचा अवधी जवळ आला आहे. काहींचा हा अवधी लोटूनही गेला आहे. आरोग्य विभागाने लसींची सरमिसळ होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोविशिल्ड लस ठेवली आहे तर ग्रामीण रुग्णालय व शहरातील केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस दिली जात आहे. शहरातील नागरिकांना आता कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाण्याची वेळ आली आहे. एकाच वेळी दोनप्रकारच्या लसींचे आयडी कार्यान्वित केले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचीही तारांबळ उडत आहे. हे नियोजन करण्यासाठी पुरेसा लससाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. अनेक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील केंद्रांवर जातात. मात्र, तिथे कोविशिल्ड नसल्याने त्यांना परत यावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून आता लसीकरणासाठी स्वतंत्र आयडी वापरण्याकरिता सम-विषम दिवसांचे नियोजन केले जाणार आहे.  या नियोजनातून लसीकरणाचा गोंधळ संपण्याची अपेक्षा आहे.  

 ग्रामीणमध्ये कोविशिल्ड, शहर कोव्हॅक्सिनलसीकरणाचा साठा पुरेसा नसल्याने आता वेगवेगळ्या लसीचे दोन आयडी एकाच वेळी चालवावे लागत आहे. यामुळे गफलत होण्याचा धोका वाढला आहे. लसीचा दुसरा डोस घेताना पहिल्यांदा जी लस घेतली, त्याच कंपनीचा दुसराही डोस आवश्यक आहे. त्यासाठीचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या ग्रामीणमध्ये कोविशिल्ड तर शहरी भागात कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. एकाच आठवड्यात ठराविक दिवस निश्चित करून लसींचे आयडी वापरले जाणार आहेत.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस