शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

नागरिक व वनअधिकाऱ्यांत संघर्ष वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 9:38 PM

नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.

ठळक मुद्देवाघिणीवरून मतभेद : प्रधान मुख्य वनसंरक्षक पांढरकवड्यात दाखल, गावांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नरभक्षक वाघिणीला ठार मारा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत असली तरी वन्यजीवप्रेमींचा मात्र याला तीव्र विरोध आहे. नेमका याच विषयावरून नागरिक व वनअधिकाºयांत संघर्ष वाढला आहे. अज्ूुन किती जणांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल आता कमालीच्या दहशतीखाली असलेले भयग्रस्त नागरिक विचारत आहेत.हा संघर्ष लक्षात घेता, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशावरूनं प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा हे शनिवारी सायंकाळी पांढरकवडात दाखल झाले असून त्यामुळे आता वाघिणीला जीवंत पकडण्याची अथवा ती बेशुद्ध न झाल्यास तिला ठार मारण्याची मोहिम वेगवान होण्याची चिन्हे आहेत. वन्यजीवप्रेमींसाठी वाघांचा जीव वाचविणे महत्त्वाचे असले तरी माणसांचा जीव वाचविणे महत्त्वाचे नाही काय, असा संतप्त प्रश्न विचारून दहशतीखाली असलेले शेतकरी, शेतमजूर वनअधिकाºयांना भांडावून सोडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा किंवा ठार मारण्याचा निर्णय ४ सप्टेंबरला दिला. त्यामुळे वनखात्याने शार्पशुटर शहाफज अली खान याला आंध्रप्रदेशातून बोलाविले होते. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने मोठा लवाजमा जंगलात लावला होता. वन्यजीवप्रेमींच्या विरोधाची दखल घेऊन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री तथा वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनी शार्प शुटर नवाबला जंगलातून परत पाठविण्याचे आदेश दिले. परिणामी मुक्कामाला असलेल्या नवाबने येथून परतीचा मार्ग धरला. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.मिश्रा यांचे मुख्यालय पांढरकवडा करून त्यांनी तेथेच राहून वाघीणीचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा हे शनिवारीच सायंकाळी पांढरकवडा येथे पोहोचले असून ते वाघिणीच्या वास्तव्याचे ठिकाण पाहण्याकरिता जंगलात गेल्याची माहिती सुत्राने दिली. त्याचे मुख्यालय उमरी राहणार असल्याची माहिती मिळाली.कामासाठी भयग्रस्तशेतमजुरांचे स्थलांतरदरम्यान, ज्या गावातील शेतकरी-शेतमजुरांचे या नरभक्षक वाघीणीने बळी घेतला त्या बोराटी, खैरगाव, झोटींगधरा, तेजनी, जिरामिरा, सराटी, सखी, जिरा, विहिरगाव, लोणी, वेडशी या गावातील व आजुबाजूच्या परिसरातील गावात या नरभक्षक वाघीणीची एवढी दहशत आहे की, शेतात कोणीही जायला तयार नाही. शेतीची कामे पूर्णत: ठप्प पडली आहे. जीरा, मिरा, वाठोडा, तेजनी, सराटी, बोराटी या भागातील शेतकरी, शेतमजूर शेतातील कामे सोडून करंजी, रूंझा, मोहदा, राळेगाव येथे हमालीची व इतर मजुरीची कामे करताना दिसत आहे.वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का? -वासुदेव आत्रामनरभक्षी वाघीण लागोपाठ माणसे मारत आहे. आतापर्यंत या वाघिणीने १४ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतल्यानंतरही या वाघिणीचा बंदोबस्त होत नाही. सरकार याचा बंदोबस्त करत नाही. वाघापेक्षा माणसाचा जीव स्वस्त आहे का, असा संतप्त सवाल वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शंकर आत्राम यांचा भाऊ वासुदेव आत्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.लोकांचा जीव जात असेल तर वन्यप्राणीही सुरक्षित नाहीतवन्यप्राण्यांचे वन्यप्राण्यांकडूनच जर जीव जात असतील तर वन्यप्राणीदेखिल सुरक्षीत राहणार नाही. त्यामुळे नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रीया वन्यजीवप्रेमी प्रा.रमजान विराणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पोलीस आणि वनखात्याकडे एक्सपर्ट शार्पशुटर असताना वादग्रस्त शार्पशुटरला पाठविण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.