शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक

By admin | Updated: November 15, 2014 02:08 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे.

संजय भगत महागाव निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. सोयाबीनच्या उत्पन्नात ९० टक्के तर कपाशीच्या उत्पन्नात ६० टक्के तूट येण्याची शक्यता आहे. यामुळे सधन आणि मध्यम शेतकरीही धास्तावले आहे. महागाव तालुक्यावर गत काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आहे. गतवर्षी ओल्या दुष्काळाने संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला होता. यावर्षीच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. मात्र अपुऱ्या पावसाने निराशा केली. ऐन पेरणीच्या वेळेसच पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पीक बहरात असताना किडींनी हल्ला केला. सोयाबीनची तर पुरती वाट लागली. ज्या शेतकऱ्यांना २०० क्ंिवटल सोयाबीन व्हायचे त्यांना केवळ २० क्ंिवटलच उत्पादन झाले. सोयाबीनच्या एका बॅगला ८० किलोही उत्पादन येत नव्हते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडली.कपाशीच्या उत्पन्नातही कमालीची घट होत आहे. बोंड परिपक्व होऊन फुटण्याच्या काळात थंडी बेपत्ता आहे. यापूर्वी अपुऱ्या पावसाने पऱ्हाटीची वाढ झाली नाही. पात्या, फुले गळून गेली. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात जवळपास ६० टक्के घट येत आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती असून कृषी विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात येणारी घट चांगलीच चिंतनीय झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातच काही नाही तर बाजारात येणार कोठून अशी अवस्था झाली आहे. परिणामी रोज चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. शेतातील कोणतीच अवजारे सुरक्षित नाही. रबीचे पीक घेतो म्हटले तरी विजेची समस्या कायम आहे. धरणाचे पाणी अजूनही शेतीला मिळाले नाही. चहुबाजूंनी कोंडी होत आहे. अशा स्थितीत तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.