शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

विश्वाला ‘मोहन-वीणा’ देणारे विश्वमोहन भट्ट यांची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या शास्त्रीय संगीतासोबतच नामवंत राजस्थानी गायकांचीही जुगलबंदी रंगणार आहे. शास्त्रीय संगीतासोबत राजस्थानी लोकगीतांचा ‘डेझर्ट स्टॉर्म विथ मंगणियार्स ऑफ राजस्थान’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सात्विक वीणा वादक पंडित सलील भट्ट असतील. तर पंडित उस्ताद अनवर खान मंगणियार हे राजस्थानी लोकगीत, सुफी रचना गाणार आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा स्मृती समारोह : रविवार २४ नोव्हेंबरला प्रेरणास्थळावर शास्त्रीय ‘स्वरांजली’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती समारोहानिमित्त २४ व २५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिकस्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे पद्मश्री, पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट्ट आणि राजस्थानी गायकांची जुगलबंदी रंगणार आहे. ही संगीत मैफल रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर आयोजित करण्यात आली आहे.बाबूजींच्या स्मृती समारोहानिमित्त दरवर्षी यवतमाळच्या रसिकांना दर्जेदार सांगितिक मेजवाणी मिळते. यंदा होणाऱ्या ‘स्वरांजली’ कार्यक्रमात पद्मश्री, पद्मभूषण तथा ग्रॅमी अवार्ड विजेते पंडित विश्वमोहन भट्ट हे रसिकांना रिझविणार आहे.राजस्थानी गायकांचीही जुगलबंदीपंडित विश्वमोहन भट्ट यांच्या शास्त्रीय संगीतासोबतच नामवंत राजस्थानी गायकांचीही जुगलबंदी रंगणार आहे. शास्त्रीय संगीतासोबत राजस्थानी लोकगीतांचा ‘डेझर्ट स्टॉर्म विथ मंगणियार्स ऑफ राजस्थान’ हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सात्विक वीणा वादक पंडित सलील भट्ट असतील. तर पंडित उस्ताद अनवर खान मंगणियार हे राजस्थानी लोकगीत, सुफी रचना गाणार आहे. तसेच तबला वादक हिमांशू महंत, खडकताल वादक कुटले खान, ढोलक वादक गोरम खान, रमेश प्रजापती (साऊंड इंजिनिअर) हा ख्यातनाम कलासंच यावेळी रसिकांना आगळीवेगळी संगीत मेजवाणी देणार आहे.पद्मश्री, पद्मभूषणसह देशविदेशात सन्मानपंडित विश्वमोहन भट्ट यांना २००२ मध्ये पद्मश्री, त्याचवेळी ग्रॅमी अवॉर्डही मिळाला. २०१२ मध्ये राजस्थानरत्न, तर २०१७ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण प्रदान केला. विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.रविवारी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ वितरणबाबूजींच्या स्मृती समारोहाचे औचित्य साधून रविवार, २४ नोव्हेंबर रोजी बीकेटी टायर्स प्रस्तूत ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे वितरण केले जाणार आहे. हा सोहळा सकाळी ११ वाजता स्थानिक दर्डा मातोश्री सभागृहात होणार आहे.सोमवारी प्रेरणास्थळावर संगीतमय प्रार्थना सभासोमवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत प्रेरणास्थळावर संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यवतमाळातील प्रथितयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील.इनामी काटा कुस्त्यांची दंगल२५ नोव्हेंबर रोजी इनामी काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने दहा लाख रुपयांची बक्षिसे असलेली ही दंगल ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता हलगी, तुतारी व डफाच्या निनादात सुरू होणार आहे.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा