शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 6:00 AM

मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, यागेश पारवेकर उपस्थित होते.

ठळक मुद्दे२५ बसफेऱ्या रद्द : ३५ संघटना बंदमध्ये सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला यवतमाळात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वाहतूक व्यवस्थेवर मात्र बंदचा परिणाम जाणवला. परिवहन महामंडळाला २५ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या.भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात बंदचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारपेठ बंद करीत बाईक रॅली काढली. बसस्थानक चौकात विविध संघटनांनी पाठिंबा देत सभा घेतली.मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, यागेश पारवेकर उपस्थित होते. या बंदला संभाजी ब्रिगेड, संताजी तेली संघटना, मराठा सेवा संघ, ऑल इंडिया धनगर समाज, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, प्रहार ऑटोचालक संघटना, कापड व्यापारी संघटना, ओबीसी आरक्षण बचाव समिती, माळी समाज संघटना, भारतीय पिछडा शोषित संघटन, गोर सेना, ऑटो युनियन, मालवाहू वाहतूक, बिरसा मुंडा संघटना, ए.पी.जे, कळंब चौक व्यापारी संघटना, शेतकरी वारकरी, एमआयएम, बिरसा ब्रिगेड शामादादा कोलाम, पेन्शनर कर्मचारी, इन्टक, समता सैनिक दल यांच्यासह ३५ संघटनांनी पाठिंबा दिला होता.तालुका पातळीवरही निघाले मोर्चेयवतमाळ शहरात बंदकरिता विविध सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. तर याच संघटनांच्या स्थानिक शाखांनी सोळाही तालुका पातळीवर बंदचे आयोजन केले होते. वणी, पुसद येथे दुपारी रॅली काढण्यात आली. तर आर्णी, नेर, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, पांढरकवडा अशा सर्वच तालुक्यांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.समर्थक-विरोधक आले आमनेसामनेयवतमाळच्या मारवाडी चौकात बंदचे समर्थक आणि विरोधक आमने सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. काहींनी दुकाने बंद ठेवण्यास नकार देत मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी वेळीच पोहचून दोन्ही गटांची समजूत काढली.

टॅग्स :Strikeसंप