स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध
By Admin | Updated: May 29, 2014 02:51 IST2014-05-29T02:51:44+5:302014-05-29T02:51:44+5:30
सध्याचे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकते.

स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध
यवतमाळ : सध्याचे युग स्पर्धेचे आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकते. याचीच जाणीव ठेवून जिल्हा शासकीय ग्रंथालयाने समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून अद्यावत अभ्यासिका तयार केली आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत शांत वातावरणात अभ्यास करण्यासोबतच त्यासाठी लागणारी सर्व पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासिरकेतील २५ युवकांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळाली आहे. जिल्हा ग्रंथालयाच्या सुसज्ज इमारतीत खालच्या मजल्यावरील कक्षातत मुलींसाठी तर दुसर्या मजल्यावरील कक्षात मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ७0 युवकांना बसण्याची सुविधा अभ्यासिकेत उपलब्ध आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी असलेली पुस्तके अतिशय महागडी आहे. सर्वसामान्य विद्यार्थी ही पुस्तके विकत घेऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीपासून तर मुलाखतीपर्यंत विविध विषयाची हजारो रुपयांची पुस्तके घ्यावी लागतात. ग्रंथालयाने मात्र ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. एमपीएससीच्या सर्व परीक्षांच्या पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंतच्या सर्व पुस्तकांचा यात समावेश आहे. याशिवाय विविध विभागांच्या निघणार्या विविध परीक्षांचे पुस्तकेही उपलब्ध आहे. सकाळी १0 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यासिकेत बसून अभ्यास करू शकतात. त्यांना लागणारी सर्व पुस्तके तेथेच उपलब्ध असल्याने आवश्यक ते पुस्तक घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात. विद्यार्थ्यांंना आवश्यक असणार्या पुस्तकांची मागणी त्यांना केल्यास संबंधित पुस्तके तातडीने उपलब्ध करून दिली जाते. जिल्हा ग्रंथालयाच्या नियोजनपूर्वक अभ्यासिकेमुळेच अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत दाखल झाले आहे. अभ्यासिकेत अभ्यास करणार्या अतुल जगताप, सपना चौधरी, नरेश मेश्राम, दीपक तुरी, निलेश राठोड, संदेश मडावी, आशिष ढळे, चंद्रशेखर केराम, प्रफुल तलवारे, सचिन विसटकर, पायल चितकुलवार, मंगला तोडसाम, जिनत शेख, उज्वला गणवीर, शीतल पाटील, संतोष तोळे, दत्तात्रय निंबाळकर, नामदेव काळतोंडे, पंकज दुधलकर, राहुल चरडे, सचिन आस्कर हे विद्यार्थी विविध खात्यांमध्ये सरकारी नोकरीत लागले आहे. या अभ्यासिकेसाठी सन २0१२-१३ मध्ये ५ लाख रुपये खर्चाची एमपीएससीची पुस्तके घेण्यात आली. सन २0१३-१४ मध्ये ७ लाख रुपयांची एमपीएससी, युपीएससीसह उत्तम व अत्याधुनिक ग्रं्नथसंपदा खरेदी करण्यात आली. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तीन लाख रुपये खचरून फर्निचर बसविण्यात आले. विद्यार्थ्यांंना योग्य मार्गदर्शक व्हावे म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश संपादन केलेल्या अधिकार्यांकडून मार्गदर्शन केले जाते. इतरही विद्यार्थ्यांंनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)