दिलासा; यवतमाळच्या पॉझेटिव्ह रुग्णांपैकी चार जणांना सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:44 IST2020-04-18T18:44:22+5:302020-04-18T18:44:46+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दहा पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी चार जणांना सुट्टी देण्यात आली असून पुढील १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहे.

दिलासा; यवतमाळच्या पॉझेटिव्ह रुग्णांपैकी चार जणांना सुट्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दहा पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी चार जणांना सुट्टी देण्यात आली असून पुढील १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहे. चार पॉझेटिव्ह रुग्ण घरी गेल्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून आता आयसोलशन वॉर्डात पॉझेटिव्ह असलेले सहा रुग्ण भरती आहे. या सहा जणांची तब्बेत चांगली असून यापैकी एका जणाची प्रकृती जी थोडीफार चिंताजनक होती, ती पण स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
आयसोलेशन वॉर्डात एकूण ५७ जण भरती आहे. गत २४ तासात एक जण भरती झाला असून शनिवारी एकूण ३८ नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविले आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या एकूण ७६७ आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात ३४ जण दाखल आहे.