रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान केंद्र शासनाने जाहीर केले. असे असतानाही महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयाने मात्र केवळ सव्वालाखाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. तेवढ्याच अनुुदानाच्या आधारावर शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले जात आहे. त्यामुळ या अनुदानाबाबत केंद्र आणि राज्य शासनात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होत आहे.कृषी यांत्रिकीकरण योजनेला चालना देण्यासाठी ट्रॅक्टरचे अनुदान चौपट करण्याची मागणी काही राज्यांनी केली होती. केंद्राने ती मान्य करीत अनुदान चौपट केले. मात्र राज्याच्या वाढीव अनुदानाची मागणी लांबणीवर टाकण्यात आली होती. यासंदर्भात कृषी आयुक्तालयाने अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून ट्रॅक्टरला केवळ सव्वा लाख रूपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला.धोरणात्मक निर्णयाची गरजविदर्भातील बहुतांश शेतकरी आर्थिक कमकुवत आहेत. पाच लाखांचे अनुदान मिळाले असते, तर दुर्बल घटकातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतला असता. आता पैशाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.ट्रॅक्टरचे अनुदान सव्वालाख रूपयेच ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी जिल्हा स्तरावर सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्याला या योजनेत एक कोटी ५६ लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे.- नवनाथ कोळपकरकृषी अधीक्षक, यवतमाळ
ट्रॅक्टरच्या अनुदानात सत्ताधाऱ्यांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:40 IST
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान केंद्र शासनाने जाहीर केले. असे असतानाही महाराष्ट्राच्या कृषी आयुक्तालयाने मात्र केवळ सव्वालाखाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. तेवढ्याच अनुुदानाच्या आधारावर शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले जात आहे.
ट्रॅक्टरच्या अनुदानात सत्ताधाऱ्यांचा घोळ
ठळक मुद्देशेतकऱ्यांची अडचण केंद्राची घोषणा ५ लाखांची, तर राज्याचा प्रस्ताव सव्वालाखाचा