जिल्हाधिकाऱ्यांनी केली ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:40+5:30

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह हे आरोग्यबाबत जागरुक आहेत. दिवसभराच्या धावपळीतूनही रात्री काही वेळ स्वत:च्या फिटनेससाठी काढतात. फिटनेससोबत लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी आहे, हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी ट्रॅकसूट घालून रात्री घराबाहेर पडले. फिरत असताना दारव्हा नाक्यावर त्यांना दोघे जण ट्रकजवळ उभे दिसले.

Collectors make arrangements for a truck driver's meal | जिल्हाधिकाऱ्यांनी केली ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था

Next
ठळक मुद्देसंवेदनशिलतेचा परिचय : रात्री ११.३० वाजता दारव्हा नाक्यावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वत्र लॉकडाऊनमुळे वाहन चालकांची जेवणाची आबाळ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अशाही संकटाच्या काळात ट्रक चालक सेवा देत आहे. शनिवारी रात्री ११.३० वाजता दारव्हा नाक्यावर ट्रक उभा करून चालक व वाहक जेवणासाठी शोधाशोध करीत होते. इतक्यात रपेट मारण्यासाठी निघालेल्या जिल्हाधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सेवेबद्दल सहानुभूतीही दर्शविली.
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह हे आरोग्यबाबत जागरुक आहेत. दिवसभराच्या धावपळीतूनही रात्री काही वेळ स्वत:च्या फिटनेससाठी काढतात. फिटनेससोबत लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी आहे, हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी ट्रॅकसूट घालून रात्री घराबाहेर पडले. फिरत असताना दारव्हा नाक्यावर त्यांना दोघे जण ट्रकजवळ उभे दिसले. त्यांनी आपण कोण, का उभे आहात, अशी विचारणा केली. त्यावेळी या ट्रक चालक व वाहकाने जेवणाची अडचण असल्याचे सांगितले. महामार्गावरही हॉटेल-ढाबे बंद आहे. त्यामुळे उपाशी असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी धीर देत चिंता करू नका, जेवणाची व्यवस्था येथेच केली जाईल, असे त्यांना आश्वस्त केले. त्याचवेळी शिवभोजन केंद्राचे संचालक विकास क्षीरसागर तेथून जात होते. जिल्हाधिकाऱ्यांना पाहून विकास क्षीरसागर थांबले. त्यांना जिल्हाधिकाºयांनी त्या चालक व वाहकाच्या जेवणाची व्यवस्था करण्याची सूचना केली. काही मिनिटातच दोन टिफीन त्या चालक व वाहकाला आणून देण्यात आले. हा संपूर्ण घटनाक्रम एका व्यक्तीने मोबाईलमध्ये टिपला. अर्थात हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नव्हते.

Web Title: Collectors make arrangements for a truck driver's meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.