चिंचोली येथील दारूचे अड्डे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:43 IST2021-05-08T04:43:56+5:302021-05-08T04:43:56+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून चिंचोली क्र. २ येथे काही देशी, विदेशी दारूचे अड्डे आहे. काही ठिकाणी गावठी दारू गाळून राजरोसपणे ...

Close the liquor den at Chincholi | चिंचोली येथील दारूचे अड्डे बंद करा

चिंचोली येथील दारूचे अड्डे बंद करा

गेल्या अनेक दिवसांपासून चिंचोली क्र. २ येथे काही देशी, विदेशी दारूचे अड्डे आहे. काही ठिकाणी गावठी दारू गाळून राजरोसपणे विक्री केली जात आहे. या दारूमुळे अनेक संसार उघडे पडले आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र टाळेबंदी आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी आहे. कुणालाही दारूच्या दुकानात दारू विकत घेता येत नाही. त्याच संधीचा लाभ घेत, चिंचोली येथे दारू अड्डे सुरू झाले.

गावात देशी, विदेशी, गावठी दारू पिण्याकरिता तालुक्यातील नागरिक गर्दी करतात. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आले. व्यसनामुळे अनेकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. चिंचोली क्र.२ येथे सुरू असलेले अवैध गावठी, देशी, विदेशीचे दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे प्रशांत गौरकर, आकाश देशमुख, प्रतीक देशमुख, अजय शिंदे, कृष्णा शिंदे, सुरेश शिंदे, साईनाथ सूर्यवंशी, श्याम गिरी सरपंचांकडे केली आहे.

Web Title: Close the liquor den at Chincholi