शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

शहर स्वच्छतेचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:24 PM

नगरपरिषदेचे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. सातत्याने वेतनातील समस्या निर्माण होत असून सफाईचे काम ठप्प होत आहे. आता मान्सूनपूर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने रोजंदारी सफाई कर्मचारी संपावर आहेत.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : वेतनासाठी सफाई कामगारांचे कामबंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेचे आर्थिक घडी विस्कटलेली आहे. सातत्याने वेतनातील समस्या निर्माण होत असून सफाईचे काम ठप्प होत आहे. आता मान्सूनपूर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. दीड महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने रोजंदारी सफाई कर्मचारी संपावर आहेत. तर डिझेल नसल्याने अ‍ॅपे व ट्रॅक्टर सारखी वाहने उभी आहे.स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रभागात सहा कुली (रोजंदारी सफाई कामगार) देण्यात आले आहे. यांच्याच भरवश्यावर शहराच्या स्वच्छतेची दारोमदार आहे. कंत्राटदार या कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देत नाही. त्यांच्या कुठल्याही कामगार म्हणून मिळालेल्या कायदेशीर हक्काचे संवर्धन केले जात नाही. धोकादायक स्थितीत काम करुनही सफाई कर्मचारी कायम उपेक्षित आहे. यांच्या आरोग्याबाबतही दक्षता घेतली जात नाही. अशाही स्थितीत जीवावर उदार होऊन शहराचे आरोग्य राखणाºया रोजंदारी सफाई कामगारांना वेळेत वेतन दिले जात नाही. दीड महिन्यांपासून वेतन नसतानाही या कामगारांना राबवून घेतले जात आहे. अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. वेतन नसेल तर काम नाही, अशी भूमिका सफाई कामगारांनी घेतली. त्यामुळे संपूर्ण शहरातील स्वच्छतेचे काम रखडले आहे. अनेक ठिकाणी कचºयाचे ढिग लागले आहे. नाल्या तुंबल्या आहेत. याचा फटका यवतमाळकरांना बसत आहे. या समस्येचा लवकरात लवकर निपटारा करा, असे निर्देश मुख्याधिकारी यांनी आरोग्य विभाग प्रमुखाला दिले आहेत. हा प्रश्न मार्गी लागण्याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.डिझेलअभावी वाहने उभीचशहरातील दाटीवाटीने असलेल्या वस्त्यांमधून कचरा संकलन करण्यासाठी तीनचाकी अ‍ॅपे खरेदी केले. असे २८ अ‍ॅपे कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र याचेही मागील पाच महिन्यांपासून बिल काढण्यात आले नाही. ट्रॅक्टरच्याही डिझेलचा प्रश्न आहे. यामुळे ही वाहने तशीच उभी आहे. अरुंद भागातून कचरा उचलण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा ठप्प पडल्याने स्लममध्ये कचºयाची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.