सफाई कामगारांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:00 IST2018-03-10T00:00:24+5:302018-03-10T00:00:24+5:30
येथील नगरपरिषदमधील कामावरून कमी करण्यात आलेल्या सफाई कामगारांना पूर्ववत कामावर रूजू करून घेण्याच्या मागणीसाठी गुरू

सफाई कामगारांचे निवेदन
ऑनलाईन लोकमत
पांढरकवडा : येथील नगरपरिषदमधील कामावरून कमी करण्यात आलेल्या सफाई कामगारांना पूर्ववत कामावर रूजू करून घेण्याच्या मागणीसाठी गुरूवारी राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषदेतर्फे उपविभागीय अधिकारी एम.भुवनेश्वरी यांना निवेदन देण्यात आले.
मागील १० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या महिला सफाई कामगारांची संख्या ३० पेक्षा अधिक असून या महिला सफाई कामगारांना तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांनी कामावरून कमी केले. अनेकदा अर्ज, विनंत्या करूनही कामावर घेतले जात नाही. तातडीने महिला सफाई कामगारांना कामावर रूजू करून घ्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना उमेश मेश्राम, संगीता पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एसडीओंना दिले. यावेळी संतोष पवार, संदीप चवरे, सुनिता लेदरे, अनिता लेदरे आदी उपस्थित होत्या.