शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या आर्थिक अधिकारांवर येणार गदा

By admin | Updated: November 15, 2014 02:08 IST

भाजपाच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासूनच धडाडीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.

यवतमाळ : भाजपाच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासूनच धडाडीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. नगराध्यक्षांकडे असलेले आर्थिक अधिकार गोठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत लवकरच अधिकृत अध्यादेश येणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता लागू करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वीच नगरपरिषदांसाठी दुहेरी लेखा पद्धती लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.नगरपरिषदेत संपूर्ण आर्थिक व्यवहार हे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने होत होते. मात्र नव्याने लागू करण्यात आलेल्या लेखा पद्धतीत हा अधिकार गोठविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. दीड वर्षांपूर्वीच हा प्रस्ताव राज्य शासनाकडून तयार करण्यात आला होता. मात्र त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी न झाल्याने तो प्रलंबित होता. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आर्थिक अधिकार गोठविण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांचे संपूर्ण आर्थिक अधिकार लवकरच गोठविले जातील. या निर्णयामुळे नगरपरिषदेतील अध्यक्षाचे महत्त्व कमी होवून तोही नामधारीच राहील, अशी भीती नगरपालिका वर्तूळातून व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षांना आर्थिक अधिकार असूनही बरेचदा प्रशासकीय कामकाज रेंगाळलेले असते. अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्याला दाद देत नाही. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता संपूर्ण विकासालाच खीळ बसेल, असा सूर नगराध्यक्षांकडून आळवला जात आहे. कुणाचेही नियंत्रण नसल्याने नगरपरिषदेच्या बॉडीलाही अर्थ उरणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षांचे अधिकार गोठविण्याऐवजी शहराच्या विकासासाठी अनेक नगरपालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाहीत, अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ती पदभरती करून परिपूर्ती करणे गरजेचे असल्याचेही नगराध्यक्षांना वाटते. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला पायबंद बसण्याऐवजी खतपाणी घातले जाईल. अनेकांना तर हा लोकशाहीवरचा घालाच वाटतो. ज्याप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अध्यक्ष व सभापतींचे आर्थिक अधिकार काढून घेतले. त्यानंतर आता तेथे अनेक अडचणी उद्भवत आहेत. अधिकार नसल्याने देयके प्रलंबित राहण्याचे प्रमाण या दोनही संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एकंदर प्रशासनाची गती मंदावली आहे. या निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम काय येतील हे पाहून पुन्हा निर्णयाबाबत फेरआढावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील बहुतांश नगराध्यक्षांचा विरोध असतानासुद्धा यवतमाळ नगराध्यक्षांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया नगराध्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. या निर्णयानंतर नेमका काय परिणाम पालिका प्रशासनावर होईल लवकरच दिसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)