बाभूळगाव तहसीलवर नागरिकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:53 IST2018-10-10T23:52:13+5:302018-10-10T23:53:18+5:30
आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला.

बाभूळगाव तहसीलवर नागरिकांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला.
नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ७० टक्के कुटुंबांकडे अद्याप आखीव पत्रिका नाही. त्यामुळे सर्वेक्षण करून अशा सर्व कुटुंबांना आखीव पत्रिका देण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली. मोर्चासाठी दुपारी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष नगरपंचायतीच्या प्रांगणात गोळा झाले. तेथून घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकले. मोर्चा तहसीलवर धडकताच नायब तहसीलदार एस.एस. थूल मोर्चेकºयांना सामोरे गेले. त्यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रकांत परचाके, काँग्रेसचे गटनेते श्रीकांत कापसे, शेख कादर, नईम खान, शुभांगी गव्हाड, धीरज रूमाले, शेख अयूब, शेख जावेद, गजानन कवडे, शौकतभाई, सैयद नजीर, बाळबुधे, प्रकाश पारतकर यांच्याशिवाय शेकडो महिला-पुरुष उपस्थित होते. येत्या १५ दिवसात आखीव पत्रिका न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मोर्चेकºयांनी दिला. थूल यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने मोर्चेकरी शांत झाले.